शाओमी आपला बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा स्मार्टफोन शाओमी Mi 5 MWC 2016 मध्ये अखेर लाँच केला. त्याचबरोबर शाओमीने आपला आणखी एक स्मार्टफोन Mi4S सुद्धा लाँच केला.
शाओमीच्या ह्या Mi 5 व्हर्जनला 3 प्रकारात लाँच केले गेले आहे. ह्याचा स्टँडर्ड एडिशन 3GB च्या LPDD4 रॅमने आणि 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत CNY 1,999 म्हणजेच जवळपास 21,000 रुपये आहे. त्याशिवाय हाय व्हर्जनमध्ये 3GB ची LPDD4 रॅम आणि 64GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याची किंमत CNY 2,299 जवळपास २४,००० रुपये आहे. आणि ह्याच्या एक्सक्लुसिव एडिशनमध्ये 4GB च्या LPDD4 रॅम आणि 128GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याची किंमत CNY 2,999 म्हणजेच जवळपास ३१,५०० रुपये आहे.
शाओमी Mi 4S प्रमाणे शाओमी Mi5 स्मार्टफोनसुद्धा चीनमध्ये 1 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्याव्यतिरिक्त कंपनीने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. हा स्मार्टफोन आपल्याला काळा. पांढरा, सोनेरी आणि रोज रंगात उपलब्ध होईल. हा शाओमीकडून येणारा पहिला स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह लाँच झाला आहे. हा कंपनीचा सर्वात मोठा स्मार्टफोन आहे.
कंपनीचे म्हणणे आहे की, हा 5.5 इंचाच्या आयफोन 6S पेक्षा ही जवळपास 14 ग्रॅम हलका आहे आणि त्यापेक्षा उत्कृष्टही आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 5.15 इंचाची FHD 1080×1920 पिक्सेलची 3D कर्व्ह्ड सेरामिक ग्लास डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याची पिक्सेल तीव्रता 428ppi आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह एड्रेनो 530 GPU सुद्धा दिला गेला आहे.
त्याचबरोबर फोटोग्राफीसाठी १६ मेगापिक्सेलचा सोनी IMX298 कॅमेरा सेंसर दिला गेला आहे, ज्यात PDAF आणि LED फ्लॅश दिला गेला आहे. त्याशिवाय ह्याच्या रियर कॅमे-यामध्ये 4-axis OIS आणि सफायर ग्लास प्रोटेक्शन लेन्स दिली गेली आहे. स्मार्टफोनमध्ये 4K व्हिडियो रेकॉर्डिंगसुद्धा होते. तसेच ४ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये 3000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.
हेदेखील वाचा – MWC 2016: अल्काटेल पॉप 4, पॉप 4 प्लस आणि पॉप 4S स्मार्टफोन लाँच
हेदेखील वाचा – सोनी अल्फा NEX-3NL मिररलेस आणि कॅनन EOS-M मिररलेस यांची तुलना