अखेर भारतात लाँच झाला शाओमी Mi 5 स्मार्टफोन, किंमत २४,९९९ रुपये
भारतामध्ये ह्या फोनचे 3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज व्हर्जन सादर केले गेले आहे आणि ह्याची किंमत २४,९९९ रुपये आहे. शाओमी Mi 5 स्मार्टफोनची पहिली फ्लॅश सैल १६ एप्रिलला Mi.com वर होईल.
मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने भारतात आज आपला नवीन फोन Mi 5 लाँच केला. भारतामध्ये ह्या फोनचे 3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज व्हर्जन सादर केले गेले आहे आणि ह्याची किंमत २४,९९९ रुपये आहे. शाओमी Mi 5 स्मार्टफोनची पहिली फ्लॅश सेल १६ एप्रिलला Mi.com वर होईल.
शाओमी Mi 5 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.15 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. ही डिस्प्ले कर्व्ह्ड 3D सेरामिक ग्लाससह येते. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता 428ppi आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्र्रॅगन 820 प्रोसेसर, एड्रेनो 530 GPU आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे.
त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा कॅमेरा फेज डिटेक्शन ऑटोफोकससह येतो. ह्या फोनने 4K व्हिडियो रेकॉर्डिंगसुद्धा केली जाऊ शकते. ह्या फोनमध्ये 4 अल्ट्रपिक्सेल फ्रंट कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्या फोनचा आकार 144.5×69.2×7.25mm आणि वजन 129 ग्रॅम आहे. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन क्विक चार्जिंग फीचरने सुसज्ज आहे. फोनमध्ये टाइप-C USB पोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय 802.11 A/B/G/AC, ब्लूटुथ 4.2, ग्लोनास आणि NFC आहे.
चीनमध्ये ह्या स्मार्टफोनला 32GB आणि 64GB अशा प्रकारात लाँच केले गेले होते. त्याचबरोबर ह्यात 3D ग्लास बॅकसह लाँच केले गेले होते. ह्याचा एक 128GB चा प्रकारसुद्धा लाँच केला गेला होता, जो एक 3D सेरामिक बॉडीने सुसज्ज होता.
हेदेखील वाचा – 4GB रॅमने सुसज्ज असलेला सॅमसंग गॅलेक्सी A9 प्रो स्मार्टफोन सादर
हेदेखील वाचा – एसर क्रोमबुक 14 लॅपटॉप: १४ तासांपर्यंत देणार बॅटरी लाइफ