मोबाईल निर्माता कंपनी शाओमी लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Mi लाँच करु शकते. मागील अनेक दिवसांपासून ह्या स्मार्टफोनविषयी बरीच माहिती समोर आली आहे. ह्या स्मार्टफोनला एका ऑनलाइन रिटेलरने आपल्या साइटवर लिस्ट केले होते, जेथे ह्या स्मार्टफोनविषयी बरीच माहिती समोर आली आहे.
Onlineheadlines.com ने अशी माहिती दिली आहे की, ह्या स्मार्टफोनला एक ऑनलाइन रिसेलर वेबसाइट गियरबीस्टवर लिस्ट केले गेले आहे. त्याचबरोबर ह्या यादीत ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बरीच माहिती समोर आली आहे. येथे ह्या स्मार्टफोनचे फोटो दिले गेले आहेत.
तसेच एक दुस-या लीकमध्ये असे सांगण्यात आले आहे की, शाओमी Mi 5 स्मार्टफोन २० फेब्रुवारीला प्रदर्शित होण्याची आणि २१ फेब्रुवारीला लाँच होण्याची शक्यता आहे. ही माहिती चीनी सोशन नेटवर्किंग वेबसाइट विबोने दिली आहे.
ह्याआधी समोर आलेल्या लीक्सनुसार, ह्या स्मार्टफोनमध्ये क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर असेल, त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंचाची QHD डिस्प्ले 1440×2560 पिक्सेल रिझोल्युशन सह असू शकते. तसेच ती गोरिल्ला ग्लास 4 ने संरक्षित असू शकते. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 4GB चा रॅमसुद्धा मिळू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 16GB आणि 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे.
तसेच ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 16 मेगापिक्सेलचा रियर आणि 6 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असू शकतो. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 3030mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळण्याची शक्यता आहे. तसेच ह्या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा असू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1.1 सह शाओमीच्या आपल्या स्वत:च्या कस्टम MiUi ओएसवर चालेल.