जसे की, आपल्या सर्वांना माहितच असेल की, ह्या स्मार्टफोनला घेऊन अनेक अफवा समोर आल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा ह्या स्मार्टफोनविषयी एक नवीन अफवा समोर आली आहे. ह्यावेळी असे सांगितले जातेय की, ह्या स्मार्टफोनला २४ फेब्रुवारीला लाँच केले जाईल. शाओमीचे वरिष्ठ अधिकारी VP Wanqiang Li नी अशी घोषणा केली आहे की, चीनमध्ये २४ फेब्रुवारीला कंपनीची स्प्रिंग कॉन्फरन्स आयोजित होणार आहे आणि तेव्हा ह्या स्मार्टफोनला लाँच केले जाऊ शकते.
काही दिवसांपासूनच ह्या स्मार्टफोनचे फोटो इंटरनेटवर सार्वजनिकरित्या प्रदर्शित केले गेेले होते. एक वीबो यूजरने हे फोटो टाकले आहेत. ह्या फोटोत Mi 5 स्मार्टफोन पाहू शकतो. फोटोंमध्ये ह्याचे डिझाईनसुद्धा दिसत आहे. ह्यात हा स्मार्टफोन पातळ दिसत आहे. ह्याचे फ्रंट पॅनलसुद्धा आकर्षक आहे.
News Fantasia द्वारा पोस्ट केल्या गेलेल्या फोटोंमध्ये होम बटन आणि वरच्या भागात इंफ्रारेड एमटिरसुद्धा दिसत आहे. स्मार्टफोनचे डिझाईन पहिल्या लीक झालेल्या रेंडर इमेजशी बरेच मिळते जुळते आहे.
ह्याआधी लीक्स झालेल्या काही माहितीनुसार, ह्या स्मार्टफोनमध्ये क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर असेल. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंचाची QHD डिस्प्ले 1440×2560 पिक्सेल रिझोल्युशन सह असू शकते. हा गोरिला ग्लास 4 ने संरक्षित आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये आपल्याला 4GB रॅमसुद्धा मिळत आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 16GB आणि 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे.
शाओमी Mi 5 मध्ये फोटोग्राफीसाठी १६ मेगापिक्सेलचा रियर आणि ६ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिगं कॅमेरासुद्धा असू शकतो. त्याचबरोबर आपल्याला 3030mAh क्षमतेची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.तसेच ह्या स्मार्टफोनला फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा असू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1.1 सह शाओमीच्या स्वत:च्या कस्टम MiUi ओएसवर चालेल.
हे देखील वाचा- 3X ऑप्टिकल झूम लेन्ससह लाँच झाला आसूस झेनफोन झूम स्मार्टफोन
हे देखील वाचा- लेनोवो K5 नोट स्मार्टफोन लाँच