मोबाईल निर्माता कंपनी श्याओमीने आपला स्मार्टफोन Mi4i ची किंमत कमी केली आहे. आता हा स्मार्टफोन ११,९९९ रुपयांत मिळेल. ह्याचे 16GB व्हर्जन काल मध्यरात्रीपासून ११,९९९ रुपयांत मिळण्यास सुरुवात झाली आहे. कंपनीने हँडसेटची किंमत एक हजार रुपयांनी कमी केली आहे.
कंपनीने ह्या स्मार्टफोनच्या कमी किंमतीविषयी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. कंपनीने ट्विट केले आहे की, “१७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून श्याओमी Mi4i च्या 16GB व्हर्जनची किंमत ११,९९९ रुपये करण्यात आली. तसेच ते पुढे म्हणाले की, आता ह्या स्मार्टफोनला खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन करावे लागणार नाही. स्मार्टफोन रजिस्ट्रेशनशिवाय Mi.com व्यतिरिक्त ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अॅमेझॉन इंडियावरही हा खरेदी करु शकता.”
श्याओमी Mi4i च्या बॉडीविषयी बोलायचे झाले तर, हा पोलीकार्बोनेट बॉडीसह 5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले देतो. ही डिस्प्ले पुर्ण 441ppi(fully laminated OGS) ने सुसज्ज आहे. हा अॅनड्रॉईड लॉलीपॉपसह MiUI 6 वर चालतो, जो इंडियन-सेंट्रिक फीचर्ससह येतो. हा नवीन MiUI 6 भारतीय भाषा जसे की हिंदी, बंगाली, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमला सपोर्ट करतो. त्याशिवाय हा दुस-या जनरेशनच्या स्नॅपड्रॅगन 615 ऑक्टा-कोर 64- बिट प्रोसेसरसह 2GB रॅमने सुसज्ज आहे.
ह्या नवीन स्मार्टफोनमध्ये टू टोन फ्लॅशसह १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. ह्या फोनमध्ये 3120mAh ची बॅटरी दिली आहे, जो कंपनीनुसार दीड दिवस चालते. त्याच्या कनेक्टिव्हिटीच्या पर्यायामध्ये ड्यूल-सिम, 4G, 3G, 2G (दोन्ही सिम स्लॉटमध्ये), वाय-फाय, ब्लूटुथ 4.1 आणि युएसबी आहे.
फ्लिपकार्टवर 11999 रुपयांत खरेदी करा मायक्रोमॅक्स श्याओमी Mi4i
अॅमझॉनवर खरेदी करा श्याओमी Mi4i फक्त Rs. 11999
स्नॅपडिलवर खरेदी करा श्याओमी Mi4i फक्त Rs. 11999