मोबाईल निर्माता कंपनी शाओमीचा स्मार्टफोन Mi4 साठी आता विंडोज १० मोबाईल रोम उपलब्ध झाला आहे. शाओमीने मायक्रोसॉफ्टशी भागीदारी करुन हा सादर केला आहे.
हा विंडोज 10 रोम फक्त LTE व्हर्जनसाठी सादर केला आहे. कंपनीने ही माहिती आपल्या वेइबो पेजवर एक फोटो पोस्ट करुन दिली आहे, ज्यात असे पाहिले गेले आहे की, शाओमी Mi 4 विंडोज 10 वर चालतो.
तसेच शाओमीने अधिकृत वेबसाइटवरही ह्याची माहिती दिली आहे आणि विेंडोज 10 ला उपलब्ध केले आहे. विंडोज 10 चा हा रोम मायक्रोसॉफ्ट विंडोज इंसायडर प्रोग्रामच्या अंतर्गत आणला आहे आणि कोणताही ग्राहक ते डाऊनलोड करु शकतो. कंपनीचा दावा आहे की, ह्याच्या माध्यमातून आपण आपल्या फोनमध्ये पुर्णपणे विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमचा अनुभव करु शकू.
शाओमी Mi 4 साठी विंडोज 10 रोम डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन रजिस्टर करावे लागेल.
१ डिसेंबरला अशी घोषणा करण्यात आली होती की, ३ डिसेंबरला Mi 4 मॉडल विंडोज रोमवर उपलब्ध होईल. विंडोज ओएसला घेऊन मायक्रोसॉफ्ट आणि चीनची टेक्नोलॉजी कंपनी शाओममध्ये ९ महिन्याआधी करार झाला होता.