आज चीन मध्ये लॉन्च होऊ शकतात Xiaomi Redmi Pro 2 किंवा Redmi 7 सीरीजचे फोन्स

आज चीन मध्ये लॉन्च होऊ शकतात Xiaomi Redmi Pro 2 किंवा Redmi 7 सीरीजचे फोन्स
HIGHLIGHTS

Xiaomi जानेवारी 2019 मध्ये आपले Xiaomi Redmi Pro 2, Redmi 7 सीरीज आणि Redmi Go स्मार्टफोन्स लॉन्च करेल आणि अशा आहे कि आज या फोन्स पैकी काही चीन मध्ये आयोजित इवेंट मध्ये लॉन्च केले जातील.

महत्त्वाचे मुद्दे

  • Redmi Pro 2 मध्ये असेल 48 मेगापिक्सलचा कॅमेरा
  • Redmi Go कंपनीचा पहिला एंड्राइड गो एडिशन सह येणार फोन असेल
  • आज चीन मध्ये Redmi 7 स्मार्टफोन पण लॉन्च केला जाऊ शकतो

 

शाओमी आज चीन मध्ये 2019 चा पहिल्या मोठ्या लॉन्च करण्यासाठी तयार आहे. या इवेंट मधून काय लॉन्च केले जाणार आहे हे अजूनतरी स्पष्ट झाले नाही, पण कंपनी ने पोस्ट केलेल्या टीजर वरून संकेत मिळाले आहेत कि आज कंपनी Redmi सीरीजचा एखादा स्मार्टफोन लॉन्च करेल. अशा व्यक्त केली जात आहे कि आज Xiaomi आपल्या Redmi 7 सीरीजचे फोन्स किंवा Redmi Pro 2 लॉन्च करेल. Redmi Pro 2 असा फोन असेल जो 48 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सह येईल. जर आतपर्यंत आलेल्या टीजर्स वर विश्वास ठेवल्यास हा डिवाइस आज लॉन्च होऊ शकतो.

आगामी Redmi 7 सीरीजचे फोन्स पण अनेकदा लीक्स मध्ये दिसले आहेत आणि सोबतच हे डिवाइसेज सर्टिफिकेशन साइट्स वर पण दिसले आहेत. Redmi 7 स्मार्टफोन नुकताच TENAA वेबसाइट वर दिसला होता, त्यामुळे आपण असे म्हणू शकतो कि चीन मध्ये हा फोन लवकरच लॉन्च केला जाईल. शाओमी Redmi 7 स्मार्टफोन 2018 च्या शेवटी लॉन्च करणार होती पण या स्मार्टफोन ऐवजी कंपनी ने नवीन Mi Play स्मार्टफोन लॉन्च केला.

Redmi 4 कंपनी ने 2017 च्या मध्यात आणि Redmi 5 डिसेंबर 2017 मध्ये लॉन्च केला होता. कंपनी ने Redmi 6 2018 च्या मध्यात लॉन्च केला, ज्यावरून अनुमान लावला जाऊ शकतो कि Redmi 7 2018 च्या शेवटी लॉन्च केला जाणार होता पण आता हा फोन 2019 च्या सुरवातीला लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.

शाओमी Redmi Pro 2 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह लॉन्च करेल जो हाई रेजोल्यूशन फोटो कॅप्चर करेल आणि डिटेल्स वाढवेल आणि चांगला झूम ऑफर करेल. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 675 प्रोसेसर सह लॉन्च केला जाईल. आशा आहे कि शाओमी Honor View20 मध्ये दिसलेला सोनीचा IMX586 सेंसर वापरेल. Honor View20 गेली महिन्यात चीन मध्ये लॉन्च केला गेला होता आणि हा स्मार्टफोन 22 जानेवारीला ग्लोबली लॉन्च केला जाईल. तसेच Xiaomi आपला Redmi Go स्मार्टफोन पण लॉन्च करेल जो एंट्री-लेवल स्मार्टफोन असेल आणि शाओमीचा पहिला एंड्राइड गो स्मार्टफोन असेल.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo