मोबाईल निर्माता कंपनी श्याओमीने Mi USB पंखा लाँच केला आहे. कंपनीने आपल्या ह्या फॅनची किंमत २४९ रुपये ठेवली आहे. श्याओमीने ह्या पंख्याची विक्री मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून सुरु केली आहे.
ह्या डिव्हाईसला कंपनीच्या ऑनलाईन स्टोरमधून खरेदी केले जाऊ शकते. श्याओमी Mi USB पंख्याला श्याओमीच्या लाइफस्टाईल आयटम विभागात विकण्याची शक्यता आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, श्याओमी Mi USB पंखा ५०००mAh बॅटरीसोबत कनेक्ट केल्यावर सलग २० तास चालतो. तेथे, १०४००mAhच्या पॉवरबँकसोबतच हा ३८ तास आणि १६०००mAh सोबत ६२ तास चालतो. हा एक फ्लेक्सिबल फ्रेमसोबत येतो. ह्यात एक USB पोर्टसुद्धा दिला गेला आहे. ह्या पंख्याला USB चार्जर, कंम्प्युटरचा USB पोर्ट आणि USB पोर्टद्वारा पॉवर बॅकसोबतसुद्धा कनेक्ट केला जाऊ शकतो.
ह्याआधी, जूनमध्ये श्याओमीने आपला LED दिवा लाँच केला होता. कंपनीने आपल्या ह्या लाइटची किंमत १९९ रुपये ठेवली होती. इच्छुक ग्राहकांनी हे माहित करुन घ्या की, ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सामानावर Mi.com वर ५० रुपये शिपिंग चार्ज लागतो.