शाओमी लाँच केला 3GB रॅम असलेला रेडमी 3 प्रो

Updated on 30-Mar-2016
HIGHLIGHTS

रेडमी 3 प्रो मध्ये 5 इंचाची HD डिस्प्लेसह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसर आणि 3GB रॅम दिली गेली आहे.

शाओमीने अधिकृतरित्या आपला नवीन स्मार्टफोन रेडमी 3 प्रो लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत 138 डॉलर ठरविण्यात आली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन राखाडी, चंदेरी आणि सोनेरी रंगात अगदी सहजपणे उपलब्ध होईल.

 

ह्याच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन पुर्ण मेटल मॅग्नेशियम एलाय यूबॉडीने सुसज्ज आहे आणि ह्यात एक आकर्षक 4100mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. हा स्मार्टफोन ड्यूल-सिम सपोर्टसह लाँच झाला आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले 1280×720 पिक्सेल रिझोल्युशनसह देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. त्याचबरोबर ह्यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसर दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 3GB च्या रॅमसह 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.

फोटोग्राफीसाठी ह्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. त्याशिवाय ह्या फोनमध्ये 4G LTE, 3G, वायफाय, ब्लूटुथ आणि GPS दिला गेला आहे.

शाओमी ३१ मार्चला भारतात आपला Mi 5 स्मार्टफोन लाँच करणार आहे. चीनमध्ये ह्या स्मार्टफोनला 32GB आणि 64GB अशा दोन प्रकारात लाँच केले गेेले होते. त्याचबरोबर ह्याला 3D ग्लास बॅकससह लाँच केले गेले होते.ह्याचा 128GB वेरियंटसुद्धा लाँच केला गेला होता, जो एक 3D सेरामिक बॉडीने सुसज्ज होता.

हेदेखील वाचा – ह्या रेडिओ अॅप्सद्वारा मनसोक्त आनंद घ्या मराठीतील सदाबहार गाण्यांचा

हेदेखील वाचा – अॅमेझॉन इंडियावर सुरु झालाय मेगा मोबाईल सेल

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :