मोबाईल निर्माता कंपनी श्याओमीने लवकरच लाँच होणा-या स्मार्टफोन ‘जेमिनी आणि रेडमी नोट 2 प्रो’बद्दल काही विशेष माहिती समोर आली आहे. खरे पाहता, ह्या दोन्ही डिवायसेसला बेंचमार्क साइटवर लिस्ट केले गेले आहे. त्याचबरोबर ह्या डिवायसेसच्या तपशीलाचा खुलासासुद्धा केला गेला आहे.
लिस्टिंग अनुसार, हा हँडसेट अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो, 3GB रॅम आणि 1.59 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडने सुसज्ज असू शकतो. गीकबेंच ब्राउजर बेंचमार्कवर लिस्ट केल्या गेलेल्या श्याओमी ‘जेमिनी’ला कंपनीच्या पुढच्या फ्लॅगशिप डिवाइस Mi 5 चे कोडनेम सांगितले जातय. लिस्टिंगच्या माध्यमातून असा इशारा देण्यात आला आहे की, हा हँडसेट क्वालकॉमद्वारा हल्लीच रिलीज झालेल्या स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
गीकबेंचच्या अजून एक लिस्टिंगने श्याओमीच्या दुस-या Mi पॅडचा सुद्धा खुलासा झाला आहे. लिस्टिंगमध्ये अशीही माहिती मिळाली आहे की, हा टॅबलेट अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालेल. Mi पॅड 2 मध्ये 2.24GHz क्वाड-कोर इंटेल एटम X5-Z8500 प्रोसेसरसह 2GB ची रॅम असण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर टीना लिस्टिंगनुसार, श्याओमी रेडमी नोट २ प्रोमध्ये मिडियाटेक MT 6795 हेलियो X10 प्रोसेसर, 5.5 इंचाचा पुर्ण एचडी डिस्प्ले, 2GB रॅम, 16GB चे अंतर्गत स्टोरेज, १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा, ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉप आणि 3060 mAh ची बॅटरी आहे.