Xiaomi च्या फोल्डेबल फोनचा विडियो आला समोर
Xiaomi चे को-फाउंडर Lin Bin ने आगामी फोल्डेबल फोनचा एक विडियो पोस्ट केला आहे ज्यावरून समजते कि हा फोन कशाप्रकारे चालेल.
महत्वाचे मुद्दे
- शाओमी ने विडियो मध्ये दाखवला आपला नवीन फोल्डेबल फोन
- हा फोन पूर्णपणे फोल्ड होत नाही पण दोन ठिकाणी घडी होतो
- हा डिवाइस एक इंजिनियर मॉडेल आहे
गेल्या काही दिवसांपासून Xiaomi च्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या बातम्या समोर येत आहेत आणि आता कंपनीचे को-फाउंडर Lin Bin ने रुमर्ड डिवाइस दाखवला आहे. Weibo वर अपलोड झालेल्या एका विडियो मध्ये Bin यांनी नवा फोल्डेबल फोन दखवला आहे. विडियो मध्ये त्यांना यावर काम करताना दाखवण्यात आले आहे आणि त्यावरून समजते कि हा कशाप्रकारे काम करतो. विशेष म्हणजे डिवाइस लॉन्च नंतर असाच चालेल कि नाही हे आता सांगता येणार नाही, कारण विडियो मध्ये दाखवण्यात आलेला गया फोन एक प्रोटोटाइप पण असू शकतो. आधी लीक झालेल्या विडियो मध्ये जो फोल्डेबल फोन दाखवण्यात आला होता हा फोन बऱ्याच अंशी तसाच आहे.
फोन विडियो मध्ये पोर्ट्रेट पोजीशन मध्ये दिसत आहे ज्यामुळे आस्पेक्ट रेश्यो 3:2 दिसतो. आधीच्या विडियो मध्ये फोन लँडस्केप पोजीशन मध्ये दिसला होता, ज्यात याचा आस्पेक्ट रेश्यो 4:3 होता. त्यामुळे आम्हाला वाटते डिवाइस वर कोणतेही ओरिएंटेशन लॉक होणार नाही किंवा असे म्हणू शकतो कि अजून हा फाइनल करण्यात आलेला नाही. नव्या फोन मध्ये फोन फोल्डेड दिसत आहे पण हा Royole FlexPai किंवा सॅमसंगच्या फोल्डेबल गॅलेक्सी फोन प्रमाणे वाटत नाही.
Bin यांच्या मते, विडियो मध्ये दाखवण्यात आलेला यूनिट एक इंजिनियरिंग यूनिट आहे. Weibo पोस्ट मध्ये त्यांनी सांगितले आहे कि, शाओमीचा डबल फोल्डिंग मोबाईल फोन येत आहे! अनेक टेक्निकल प्रॉब्लम्स जसे कि फ्लेक्सिबल फोल्डिंग स्क्रीन टेक्नॉलॉजी, फोर-व्हील ड्राइव फोल्डिंग शाफ्ट टेक्नॉलॉजी, फ्लेक्सिबल कवर टेक्नॉलॉजी आणि MIUI ऍडाप्शन वर विजय मिळवल्यानंतर आम्ही पहिला फोल्डिंग स्क्रीन मोबाईल फोन बनवला आहे. सिममेट्रिकल डबल-फोल्डेड फॉर्म चांगलप्रकारे टॅबलेट आणि मोबाईल फोन दोन्हींचा अनुभव देतो जो प्रॅक्टिकल आणि ब्यूटीफुल आहे. पण तरीही हि अजूनही एक इंजिनियरिंग मशीन आहे, हि सर्वांना दखवण्यासाठी बाहेर आणण्यात आली आहे.” आम्ही ऍप मध्ये Lin नेविगेटिंग बघू शकतो. डिवाइस सुंदररित्या नव्या फोल्डेड डिस्प्लेला ऍडाप्ट करतो आणि कंपनी ने हा पूर्ण करण्यास खूप मेहनत केली आहे. तसेच डिस्प्ले फोल्ड केल्यानंतर पण साइड्स आणि बॅक ऍक्टिव राहते.
Xiaomi व्यतिरिक्त अनेक स्मार्टफोन निर्माता जसे कि सॅमसंग, लेनोवो, LG आणि हुवावे पण आपले फोल्डेबल किंवा बेंडेबल डिवाइसेज लॉन्च करू शकते. सॅमसंग आपल्या Galaxy S10 सोबत आपला नवीन फोल्डेबल फोन पण लॉन्च करू शकते.