Xiaomi ग्लोबल लॉन्च इवेंट मध्ये लवकरच लॉन्च करू शकते Mi A2 एंड्राइड वन स्मार्टफोन

Xiaomi ग्लोबल लॉन्च इवेंट मध्ये लवकरच लॉन्च करू शकते Mi A2 एंड्राइड वन स्मार्टफोन
HIGHLIGHTS

Xiaomi ग्लोबल लॉन्च इवेंट मागच्या वर्षी भारतात आयोजित करण्यात आला होता, यावर्षी हा इवेंट कोणत्या देशात आयोजित केला जाईल ही माहिती मिळाली नाही.

Xiaomi could launch Mi A2 android one smartphone in global launch event: Xiaomi ने आपल्या आगामी ग्लोबल इवेंट बद्दल संकेत द्यायला सुरवात केली आहे. अंदाज लावला जात आहे की या ग्लोबल इवेंट मध्ये कंपनी Xiaomi Mi A2 एंड्राइड वन स्मार्टफोन लॉन्च करेल. मागच्या वर्षी कंपनी ने भारतात ग्लोबल इवेंट मध्ये Mi A1 वन स्मार्टफोन लॉन्च केला होता, जो चीन मध्ये Xiaomi Mi 5X या नावाने लॉन्च करण्यात आला होता. या डिवाइस ने प्योर स्टॉक एंड्राइड एक्सपीरियंस दिला होता. Xiaomi ने काही दिवसांपूर्वी चीन मध्ये Xiaomi Mi 6X स्मार्टफोन लॉन्च केला आहे आणि आशा आहे की हा डिवाइस भारतात Mi A2 नावाने लवकरच लॉन्च केला जाईल. 

कंपनी ने आपल्या ट्विटर अकाउंट वरून ग्लोबल इवेंट बद्दल टीज केले आहे. मागच्या वर्षी ग्लोबल लॉन्च इवेंट भारतात आयोजित झाला होता आणि यावेळी आशा व्यक्त केली जात आहे की कंपनी अंतर्राष्ट्रीय महत्व लक्षात घेऊन कोणत्यातरी दुसर्‍या देशात हा इवेंट आयोजित करेल. 

Xiaomi Mi A2 बद्दल अनेक लीक्स आणि रुमर्स समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी हा डिवाइस एका स्विस साइट वर दिसला होता आणि डिवाइस ने TENAA वर पण एंट्री केली आहे. Mi A2 च्या 32GB वेरिएंट ची किंमत CHF 289 (जवळपास Rs 19,733) असेल, तसेच 64GB मॉडेल ची किंमत CHF 329 (जवळपास Rs 22,465) असेल आणि आणि टॉप एंड वेरिएंट बद्दल बोलायचे तर 128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंट ची किंमत CHF 369 (जवळपास Rs 25,200) असेल. 

Xiaomi Mi 6X बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये स्नॅपड्रॅगन 660 आहे ज्यात आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंजन (AIE) फीचर आहे. हा डिवाइस दोन वेरिएन्ट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याच्या एक वेरिएंट मध्ये 4 GB रॅम आणि दुसर्‍या वेरिएंट मध्ये 6 GB रॅम आहे आणि डिवाइस च्या 6 GB रॅम वेरिएंट मध्ये 128 GB स्टोरेज आहे. याव्यतिरिक्त डिवाइस मध्ये 3,010mAh ची बॅटरी आहे जी क्विक चार्ज 3.0 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. तसेच डिवाइस मध्ये स्मार्ट AI पॉवर फंक्शन पण आहे. 

हा डिवाइस एंड्राइड 8.1 ओरियो वर चालतो आणि सोबतच यात MIUI 9.5 आहे जो फुल स्क्रीन जेस्चर सपोर्ट सह येतो. 
डिवाइस च्या बॅक वर 20 आणि 12 मेगापिक्सल चा ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो f/1.75 अपर्चर ऑफर करत आहे. प्रायमरी Sony IMX486 सेंसर ज्याची पिक्सल साइज 1.25μm आहे आणि सेकेंडरी Sony IMX376 सेंसर चा अपर्चर f/1.75 आहे ज्याची पिक्सल साइज 1.25μm आहे. सेकेंडरी सेंसर एक टेलीफोटो लेंस आहे. सेल्फी साठी डिवाइस मध्ये 20 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे ज्या सोबत सॉफ्ट लाइट LED फ्लॅश आहे. फ्रंट फेसिंग कॅमेरा च्या मदतीने फोन अनलॉक पण केला जाऊ शकतो. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo