digit zero1 awards

Xiaomi Christmas Sale: 50MP कॅमेरासह येणाऱ्या कंपनीच्या लोकप्रिय स्मार्टफोनवर बंपर Discount, बघा ऑफर 

Xiaomi Christmas Sale: 50MP कॅमेरासह येणाऱ्या कंपनीच्या लोकप्रिय स्मार्टफोनवर बंपर Discount, बघा ऑफर 
HIGHLIGHTS

Mi.com वर Xiaomi Christmas Sale सुरु झाली आहे.

सेलदरम्यान, Redmi Note 12 Pro 5G प्रचंड सवलतीसह खरेदी करण्याची संधी

HDFC, ICICI आणि SBI बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 3000 रुपयांची झटपट सूट

Redmi Note 12 Pro 5G हा कंपनीचा एक लोकप्रिय मिड-रेंज स्मार्टफोन आहे, जो 25000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतो. Redmi Note 13 Pro 5G लाँच होण्यापूर्वी कंपनीने मागील मॉडेलवर मोठ्या डिस्काउंटची घोषणा केली आहे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Redmi Note 13 Pro 5G सिरीजच्या भारतीय लाॅंचसाठी आणखी दोन आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे पूर्वीचा फोन तुम्हाला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. दरम्यान, Mi.com वर Xiaomi Christmas Sale देखील सुरु झाली आहे.

Redmi Note 12 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स

xiaomi-Redmi-note-12-pro-5G Xmas Offer

या हँडसेटच्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत सेलदरम्यान 20,999 रुपयांपासून सुरू होते. तर, Note 12 Pro च्या 8GB + 128GB आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. तर, 12GB + 256GB मेमरीसह टॉप-एंड पर्याय Xiaomi च्या वेबसाइटवर 25,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही डिव्हाइसवर HDFC, ICICI आणि SBI बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 3000 रुपयांची झटपट सूट मिळेल. ही ऑफर ICICI नेट बँकिंगद्वारे देखील उपलब्ध आहे.

याशिवाय Mi Exchange ऑफरद्वारे स्मार्टफोनवर 3,000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. तुम्ही नो-कॉस्ट EMI पर्याय देखील निवडू शकता. हा फोन ग्लेशियर ब्लू, ओनिक्स ब्लॅक आणि स्टारडस्ट पर्पल या तीन कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.

Redmi Note 12 Pro 5G

Redmi Note 12 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळतो, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा डिव्हाइस 6nm Dimensity 1080 5G CPU आणि आर्म Mali-G68 MC4 GPU सह येतो. ऑप्टिक्ससाठी हँडसेटमध्ये 50MP OIS प्रायमरी लेन्स, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो लेन्स आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. हा 5G फोन 5000mAh बॅटरीवर चालतो, जो 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. याशिवाय, फोनच्या सिक्योरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट रीडरही देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo