शाओमी ‘बर्लिन’ स्मार्टफोन गीकबेंच वर दिसला, स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर आहे यात

Updated on 13-Mar-2018
HIGHLIGHTS

या डिवाइस मध्ये स्नॅपड्रॅगन 632 एसओसी 3 जीबी रॅम सह येतो.

शाओमी नवीन स्मार्टफोन 'बर्लिन' कोडनेम सह गीकबेंच वर दिसला आहे. आशा आहे की याचे अनावरण 27 मार्चला होईल. लिस्टिंग नुसार, डिवाइस एंड्रॉयड 7.1.2 नूगा वर चालेल आणि यात अघोषित क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 632 एसओसी चिपसेट असेल. 
हा स्मार्टफोन 3 जीबी रॅम सह 1.2 गीगाहर्ट्ज सोबत येईल. याव्यतिरिक्त या रहस्यमयी स्मार्टफोन बद्दल अजुन जास्त माहिती उपलब्ध झाली नाही. पण या डिवाइस ने सिंगल-कोर टेस्ट मध्ये 1155 अंक आणि मल्टी-कोर परफॉर्मेंस मध्ये 2738 स्कोर मिळवले आहेत. 
हे स्पष्ट आहे की 'बर्लिन' Mi Mix 2S नाही आहे कारण शाओमी ने आधीच सांगितले आहे की Mi Mix 2S मध्ये क्वालकॉम चा लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असेल. Mi Mix 2S चे फोटो पण लीक झाले आहेत, ज्यावरून समजत आहे की हा डिवाइस डुअल रियर कॅमेरा सेटअप आणि सिरेमिक किंवा ग्लास बॅक सह येईल. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :