Xiaomi च्या लेटेस्ट स्मार्टफोन सिरीज Xiaomi 15 सिरीजची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. अलीकडेच Xiaomi ने प्रीमियम सिरीजअंतर्गत भारतीय बाजारात Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Ultra हे दोन स्मार्टफोन लाँच केले. आजपासून हे फोन्स प्री-बुकिंग करता येईल. स्वस्तात हे महागडे फोन खरेदी करण्यासाठी प्री-बुकिंग करणे, योग्य निर्णय असेल. कंपनी प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हजारो रुपयांची सूट देत आहे. पाहुयात ऑफर्स-
Also Read: OnePlus Nord 4 5G तब्बल 8000 रुपयांच्या Discount सह खरेदीची संधी, पहा टॉप 5 फीचर्स
Xiaomi 15 सिरीजची प्री-बुकिंग आज म्हणजेच 19 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली. या सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोन्सची खुली विक्री 2 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. Xiaomi 15 ची किंमत 64,999 रुपये इतकी आहे. स्मार्टफोनची प्री-बुकिंग करणाऱ्यांना 5000 रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळेल. तर, प्री-बुकिंगवर ICICI बँकेच्या कार्डवर देखील 5000 रुपयांची त्वरित सूट मिळेल. तसेच, यासह Xiaomi केअर प्लॅन 5999 रुपयांना दिला जाईल. एवढेच नाही तर, 10,999 रुपयांचे लाभ देखील आहेत.
Xiaomi 15 5G मध्ये 6.36-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, अल्ट्रा फोनमध्ये 6.73 इंच लांबीचा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
Xiaomi 15 5G सिरीज स्मार्टफोनमध्ये 3nm Snapdragon 8 Elite प्रोसेसर मिळत आहे. यासह, या फोनमध्ये IP68 रेटिंग देखील देण्यात आली आहे. तसेच, अल्ट्रा मॉडेलमध्ये IP54 रेटिंग मिळेल.
फोटोग्राफीसाठी, Xiaomi 15 5G फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 50MP चा टेलिफोटो लेन्स आणि 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.
दुसरीकडे, यात 50MP प्रायमरी सेन्सर, 50MP झूम सेन्सर, 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 200MP पेरिस्कोप लेन्स आहे. यात ४.३x ऑप्टिकल झूम देखील आहे.
Xiaomi 15 5G फोनमध्ये 5240mAh बॅटरी आहे. स्मार्टफोनमध्ये 50W वायरलेस फास्ट चार्जिंग आणि 90W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आहे. तर, Ultra फोनमध्ये 5410mAh बॅटरी आहे.