Xiaomi ने ऑक्टोबर 2023 मध्ये आपली फ्लॅगशिप 14 सीरीज लाँच केली आहे. या अंतर्गत, आता 2024 मध्ये या सिरीजमधील Xiaomi 14 Ultra मॉडेल जबरदस्त फीचर्ससह सादर केला जाण्याची अपेक्षा आहे. या फोनची लाँच टाइमलाइन अलीकडेच पुढे आली आहे. त्यानंतर, आता डिव्हाइसचे ग्लोबल व्हेरिएंट बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर दिसले आहे. चला तर मग जात वेळ न घालवता बघुयात आगामी Xiaomi 14 Ultra बाबत सर्व तपशील-
एका टिपस्टरने Xiaomi 14 Ultra संदर्भात Weibo वर लाँच टाइमलाइन शेअर केली होती. हा फोन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात Leica Summilux लेन्ससह लॉन्च केला जाऊ शकतो, अशी माहिती मिळाली आहे.
Xiaomi 14 Ultra हे मॉडेल क्रमांक 24030PN60G सह गीकबेंचवर दिसले आहे. यातील ‘G’ म्हणजे ग्लोबल मॉडेल सूचित करतो. Geekbench सूची दर्शविते की, Xiaomi 14 अल्ट्रा ऑक्टा-कोर चिपसेटद्वारे समर्थित असेल. त्याची कमाल CPU क्लॉक स्पीड 3.30 GHz आहे आणि Adreno 750 GPU सह स्पॉट आहे. तर, स्मार्टफोन 14.84GB रॅम आहे, म्हणजेच तो 16GB पर्यंत रॅमने सुसज्ज असू शकतो. याशिवाय, हे नवीनतम Android 14 OS वर आधारित असेल, अशी देखील माहिती मिळाली आहे.
Xiaomi 14 Ultra मध्ये 6.7 इंच लांबीचा क्वाड कर्व AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, जो 144Hz रिफ्रेश रेटच्या सपोर्टसह येईल. उत्तम कार्यक्षमतेसाठी या फोनमध्ये Qualcomm चा सर्वात पॉवरफुल Snapdragon 8 Gen 3 चिपसेट उपलब्ध असण्याची शक्यता आहे. Xiaomi 14 Ultra 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह सुसज्ज असू शकते.
लीकनुसार, Xiaomi 14 Ultra क्वाड कॅमेरा सेटअपसह येईल. यात 1-इंच सेन्सर आणि LYT-900 50MP प्रायमरी कॅमेरा, 120 मिमी पर्यंत फोकल लांबीसह 50MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा, 50MP IMX8-सीरीज अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 50MP टेलीफोटो कॅमेरा मिळू शकतो. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा लेन्स मिळेल. या फोनमध्ये 5,180mAh बॅटरी आहे, जी 80W वायरलेस चार्जिंग आणि 90W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते.