Xiaomi 14 Ultra स्मार्टफोनच्या लाँचची चर्चा टेक विश्वात जोरात सुरू आहे. या आगामी स्मार्टफोनशी संबंधित अनेक अहवाल लीक झाले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या लीक्समध्ये फोनचे लाँच डिटेल्स देखील उघड करण्यात आले आहेत. दरम्यान, नुकतेच आलेल्या एका ताज्या रिपोर्टमध्ये Xiaomi 14 Ultra च्या कॅमेराशी संबंधित अपडेट देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात आगामी फोनची संभावित किंमत आणि इतर तपशील.
Xiaomi ने Xiaomi 14 Ultra च्या लाँच करण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. पण लीक्सनुसार, हा स्मार्टफोन नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाँच केला जाईल, असे म्हटले जात आहे. या स्मार्टफोनची किंमत 70 ते 80 हजार रुपयांच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते.
सोशल मीडियावर पुढे आलेल्या एका ताज्या अहवालामध्ये Xiaomi 14 Ultra चा कॅमेरा तपशील लीक केला आहे. टिपस्टरनुसार, आगामी फोनमध्ये 50MP Sony LYT 900 प्रायमरी सेन्सर असण्याची शक्यता आहे. ही कॅमेरा लेन्स ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरला सपोर्ट करेल, ज्याचे अपर्चर f/1.63 असेल. त्याबरोबरच, कॅमेरा सेटअपमध्ये 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि टेलिफोटो लेन्स देखील असेल. तसेच, मागील काही रिपोर्ट्समधून असे समोर आले आहे की, आगामी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा असेल.
लीक्सनुसार, Xiaomi 14 Ultra मध्ये 6.7 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळेल. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर फोनमध्ये मिळणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी फोनमध्ये 5180mAh बॅटरी असेल, जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये ड्युअल सिम, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट दिले जातील. तसेच, डिव्हाइसमध्ये सिक्योरिटीसाठी अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देखील असेल.