digit zero1 awards

आगामी Xiaomi 14 Ultra मध्ये असतील 50MP चे तब्बल चार कॅमेरे,फोटोग्राफीचा मिळेल सर्वोत्तम अनुभव। Tech News 

आगामी Xiaomi 14 Ultra मध्ये असतील 50MP चे तब्बल चार कॅमेरे,फोटोग्राफीचा मिळेल सर्वोत्तम अनुभव। Tech News 
HIGHLIGHTS

Xiaomi लवकरच Xiaomi 14 Ultra विश्वात लाँच करू शकते.

लाँचपूर्वी या स्मार्टफोनचे कॅमेरा तपशील ऑनलाईन लीक झाले आहेत.

डिव्हाइस सर्वात वेगवान क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेटने सुसज्ज असेल.

Xiaomi ने काही महिन्यांपूर्वीच आपल्या मूळ ठिकाणी म्हणजेच चीनमध्ये Xiaomi 14 आणि 14 Pro लाँच केले होते. तर, या सिरीजचे टॉप मॉडेल म्हणजेच Xiaomi 14 Ultra लवकरच सादर केले जाऊ शकते. हा स्मार्टफोन सतत चर्चेचा विषय बनला आहे, कारण यात अनेक उत्कृष्ट स्पेसिफिकेशन्स असणार आहेत, असे ऑनलाईनरित्या समोर आले आहे. दरम्यान, आता लेटेस्ट लीकमध्ये त्याच्या कॅमेरा स्पेक्सचे डिटेल्सदेखील पुढे आले आहे. बघुयात सविस्तर- 

हे सुद्धा वाचा: भारतात किती असेल आगामी iQOO 12 ची किंमत, तुमच्या बजेटमध्ये येईल का फोन? Tech News

 Xiaomi 14 Ultra कॅमेरा डिटेल्स लीक 

Xiaomi 14 Ultra camera specs leaked: Quad camera setup, 50MP main camera & more

एका प्रसिद्ध टिपस्टरने Xiaomi 14 Ultra बाबत ऑनलाईन तपशील शेअर केला आहे. लीकनुसार, डिव्हाइसमध्ये मागील पॅनलवरील कॅमेरा मॉड्यूलमध्ये 50MP + 50MP + 50MP + 50MP लेन्स असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच यात व्हेरिएबल अपर्चरसाठीही सपोर्ट असेल.  लीकनुसार, Xiaomi 14 Ultra चा प्राथमिक कॅमेरा f/1.6 ते f/4.0 पर्यंतच्या अपर्चरसह येईल.

Xiaomi 14 Ultra चे इतर लीक्स 

लीकनुसार, फ्लॅगशिप फोन Xiaomi 14 Ultra मध्ये मोठा 6.7 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz रिफ्रेश असणे अपेक्षित आहे. डिव्हाइस सर्वात वेगवान क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेटने सुसज्ज असेल, जे नुकतेच बाजारात सादर केले गेले आहे. यासोबतच, डिव्हाइस 16GB रॅम आणि 1TB इंटर्नल स्टोरेजला सपोर्ट करेल.

त्याबरोबरच, फोनमध्ये मिळणाऱ्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनला पॉवर देण्यासाठी Xiaomi 14 Ultra मध्ये दीर्घकाळ टिकणारी 5000mAh बॅटरी असेल, जी 120W जलद चार्जिंगसह 50W वायरलेस चार्जिंगसह सुसज्ज असू शकते. तर, फोनमध्ये IP68 रेटिंग, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 5G, ब्लूटूथ, Wi-Fi असे अनेक फीचर्स देखील दिले जाऊ शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo