Xiaomi 14 लवकरच भारतात होणार लाँच, हा Powerful स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स लीक। Tech News 

Xiaomi 14 लवकरच भारतात होणार लाँच, हा Powerful स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स लीक। Tech News 
HIGHLIGHTS

Xiaomi 14 भारतात मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2024 मध्ये लाँच होण्याची शक्यता

हा फोन सर्टिफिकेशन साइट NBTC वर लिस्ट झाला आहे.

हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह येऊ शकतो.

Xiaomi चा फोन Xiaomi 14 ऑक्टोबर 2023 मध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. ज्यासोबत Xiaomi 14 Pro देखील बाजारात लाँच करण्यात आला होता. अलीकडेच आलेल्या अहवालानुसार, यापैकी एक Xiaomi 14 पुढील महिन्यात होणार्‍या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2024 (MWC 2024) च्या मंचावरून भारतीय बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठेत प्रवेश करेल.

हे सुद्धा वाचा: Samsung ची आश्चर्यकारक डील! Latest Galaxy S24 च्या प्री-बुकिंगवर हजारो रुपयांची मोठी सूट। Tech News

दरम्यान, आता हा फोन सर्टिफिकेशन साइट NBTC वर लिस्ट झाला आहे. होय, Xiaomi 14 स्मार्टफोनला NBTC प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. NBTC चे पूर्ण रूप राष्ट्रीय प्रसारण आणि दूरसंचार आयोग आहे. याआधी, हा फोन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) वर सूचिबद्ध करण्यात आला होता. वरील दोन प्रमाणपत्रे प्राप्त केल्यानंतर, Xiaomi 14 लवकरच भारतात लाँच होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Xiaomi 14 Ultra camera specs leaked: Quad camera setup, 50MP main camera & more

Xiaomi 14 चे संभावित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वर सांगितल्याप्रमाणे, हा Xiaomi 14 स्मार्टफोन चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, फोन 6.36 इंच लांबीच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेटवर लॉन्च होणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. ग्राफिक्ससाठी यात Adreno 750 GPU आहे. हा स्मार्टफोन Xiaomi HyperOS वर चालतो.

फोटोग्राफीसाठी, हा फोन ट्रिपल रिअर कॅमेराला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर 50MP चा प्रायमरी सेन्सर सोबत 50MP वाइड अँगल लेन्स आणि 64MP टेलिफोटो लेन्स आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसह, Xiaomi 14 मध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन 4,610 mAh बॅटरीने सुसज्ज असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी 90W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगलाही सपोर्ट करतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo