digit zero1 awards

Good News! Xiaomi 14 ची भारतीय लाँच तारीख अखेर जाहीर, ‘या’ दिवशी भारतात घेणार जबरदस्त Entry

Good News! Xiaomi 14 ची भारतीय लाँच तारीख अखेर जाहीर, ‘या’ दिवशी भारतात घेणार जबरदस्त Entry
HIGHLIGHTS

Xiaomi 14 सिरीजची भारत आणि जागतिक बाजारपेठेसाठी लाँच डेट जाहीर

सिरीज MWC म्हणजेच मोबाइल वर्ल्ड कॉन्फरन्स 2024 मध्ये लाँच होईल.

हा फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज आहे.

Xiaomi ची लेटेस्ट Xiaomi 14 सीरीज चीनमध्ये अलीकडेच ऑक्टोबर महिन्यात लाँच करण्यात आली आहे. त्यानंतर, आता जागतिक बाजारपेठेबरोबरच ही सिरीज भारतीय बाजारपेठेतही प्रवेश करण्यास सज्ज झाली आहे. ताज्या अहवालानुसार, Xiaomi 14 ची भारत आणि जागतिक बाजारपेठेसाठी लाँच डेट जाहीर करण्यात आली आहे.

ताज्या रिपोर्टनुसार, Xiaomi चा फ्लॅगशिप स्मार्टफोन पुढील वर्षी भारतात लाँच केला जाईल. MWC म्हणजेच मोबाइल वर्ल्ड कॉन्फरन्स 2024 मध्ये हा फोन जागतिक बाजारपेठेत सादर केला जाईल. 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान हा मेगा इव्हेंट आयोजित केला जाणार आहे. चला तर मग या स्मार्टफोनची लाँच डेट आणि इतर तपशील जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा: Amazing! Vodafone Idea ने Maldives साठी लाँच केला नवीन इंटरनॅशनल प्लॅन, जाणून घ्या किंमत। Tech News

Xiaomi 14
Xiaomi 14

Xiaomi 14 लॉन्चिंग डिटेल्स

मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध टिपस्टर योगेश बरार यांनी सांगितले की, पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या MWC म्हणजेच मोबाइल वर्ल्ड कॉन्फरन्स 2024 मध्ये हा फोन जागतिक बाजारपेठेत लाँच केला जाईल. अनेक कंपन्या MWC सुरू होण्याच्या एक दिवस आधी मोठ्या घोषणा करतात. त्यामुळे Xiaomi 14 सिरीज 25 फेब्रुवारीला लाँच केली जाऊ शकते. लवकरच Xiaomi फोनच्या लाँच डेट कंपनीकडून कन्फर्म करण्यात येईल. ग्लोबल सोबतच हा फोन भारतातही त्याच दिवशी म्हणजेच 25 फेब्रुवारी 2024 ला लाँच होण्याची शक्यता आहे.

Xiaomi 14 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वर सांगितल्याप्रमाणे, हा स्मार्टफोन आधीच चिनी बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, या स्मार्टफोनमध्ये 6.36 इंच लांबीचा LTPO OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 16GB रॅम आणि 1TB अंतर्गत स्टोरेजसह येतो.

Xiaomi 14 Pro

फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह आहे. तर, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 32MP सेल्फी कॅमेरा आहे. बॅटरी बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,610mAh बॅटरीसह येतो. तर, यात 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि IP68 रेटिंगसह देखील मिळेल. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo