Xiaomi ने अलीकडेच भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन Xiaomi 14 लाँच केला आहे. हा बहुप्रतीक्षित फोन लाँच झाल्यानंतर आजपासून या फोनची विक्री भारतात सुरू होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनसोबतच Xiaomi 14 Ultra या सीरीजचा दुसरा स्मार्टफोनही लाँच करण्यात आला आहे. मात्र, अल्ट्रा व्हेरिएंटची विक्री एका महिन्याने म्हणेजच 12 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या सिरीजचे बेस मॉडेल आजपासून म्हणजेच 11 मार्च 2024 पासून खरेदी करता येईल. तसेच, तुम्ही अल्ट्रा मॉडेल रिजर्व करण्यास देखील सक्षम असाल.
दरम्यान, पहिल्या सेलमध्ये ग्राहकांनी निवडक बँकांच्या कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास त्यांना हजारो रुपयांची बचत करता येईल. स्मार्टफोनची विक्री अधिकृत वेबसाइट आणि लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइटवर सुरू होईल. बघुयात सविस्तर तपशील-
Xiaomi 14 ची स्मार्टफोनची किंमत 69,999 रुपये आहे. हा फोन एकाच व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे. Amazon आणि Flipkart सोबत mi.com वर आज दुपारी 12 वाजल्यापासून विक्री सुरू होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये ICICI, HDFC आणि Amex कार्डवर 5000 रुपयांची सूट मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, एक्सचेंज ऑफरसह 5000 रुपयांचा बोनस देखील दिला जाईल. हा स्मार्टफोन ब्लॅक, जेड ग्रीन आणि व्हाइट या तीन कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येईल.
Xiaomi च्या या लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 6.36 इंच लांबीचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी Xiaomi 14 मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 12GB रॅमसह 512GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. पाण्याच्या प्रतिकारासाठी हा IP86 रेटिंगसह येतो.
फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस 50MP Leica प्राइमरी सेन्सर प्रदान करण्यात आला आहे. तसेच, 50MP चा दुसरा कॅमेरा आणि 50MP चा तिसरा कॅमेरा उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. हे Xiaomi Hyper OS वर कार्य करेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 90W Xiaomi हायपर चार्ज आणि 50W वायरलेस टर्बोचार्ज सपोर्टसह 4610mAh बॅटरी आहे.