Xiaomi 14 स्मार्टफोन भारतात पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच होणार लाँच, जाणून घ्या सर्व डिटेल्स। Tech News

Updated on 20-Feb-2024
HIGHLIGHTS

Xiaomi India ने अधिकृतपणे Xiaomi 14 ची भारतीय लाँच डेट जाहीर केली.

Xiaomi 14 भारतात पुढील म्हणजेच मार्च महिन्याच्या सुरुवातीला लाँच होईल.

हा फोन पॉवरफुल प्रोसेसरसह Qualcomm Snapdragon 8 Gen 3 ने सुसज्ज असेल.

Xiaomi 14 ची वाट पाहणाऱ्या भारतीय मोबाईल यूजर्ससाठी एक चांगली बातमी आली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, ते पॉवरफुल प्रोसेसरसह Qualcomm Snapdragon 8 Gen 3 ने सुसज्ज हा फोन भारतात आणत आहे. एवढेच नाही तर, अधिकृत घोषणा करताना ब्रँडने म्हटले आहे की Xiaomi 14 भारतात पुढील म्हणजेच मार्च महिन्याच्या सुरुवातीला लाँच केला जाईल.

Xiaomi 14 इंडिया लॉन्चिंग डिटेल्स

Xiaomi India ने अधिकृतपणे माहिती दिली आहे की, ते 7 मार्च रोजी भारतात एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे. या इव्हेंटमध्ये Xiaomi 14 या भारतात लाँच केला जाईल. कंपनीने #XiaomixLeica या हॅशटॅगसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या आगामी फोनला टीज करणे सुरू केले आहे. कंपनी फोन लाँच होण्याची वेळ आणि त्याच्या लाईव्ह स्ट्रीमबद्दल लवकरच अपडेट देणार आहे.

Xiaomi 14 ची अपेक्षित किंमत

लक्षात घ्या की, Xiaomi 14 आधीच चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा फोन 4 मेमरी वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला होता, ज्याची किंमत 3999 युआन म्हणजेच अंदाजे 46,000 रुपये आहे. तर, ते 4,999 युआन म्हणजेच अंदाजे 57,000 रुपयांपर्यंत आहे. ही 8GB+256GB आणि 16GB+1TB ची किंमत आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, Xiaomi 14 ची भारतातील किंमत 40 हजार रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र फोनचा 1TB प्रकार भारतात आणला जाणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Xiaomi 14 चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वर सांगितल्याप्रमाणे, हा फोन आधीच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, Xiaomi 14 स्मार्टफोनमध्ये 6.36 इंच लांबीच्या पंच-होल OLED डिस्प्ले आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. Xiaomi चा हा मोबाईल ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर 50 MP च्या प्रायमरी सेन्सरसोबत 50MP वाइड अँगल लेन्स आणि 64MP टेलिफोटो लेन्स आहे. तसेच, फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच, Xiaomi 14 मध्ये 4,610 mAh बॅटरी आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :