विशेष डिझाईनसह Xiaomi 14 Civi Limited Edition लवकरच भारतात होणार दाखल, पहा किंमत
Xiaomi ने जुन महिन्यात अलीकडेच Xiaomi 14 Civi लाँच केला होता.
पांडा डिझाइनसह Xiaomi 14 Civi Limited Edition पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार
Xiaomi 14 Civi स्मार्टफोन मिड बजेटमध्ये लाँच करण्यात आला होता.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने अलीकडेच म्हणजे जुन महिन्यात Xiaomi 14 Civi लाँच केला होता. फोन लाँच झाल्याच्या काही काळानंतरच कंपनीने एक नवीन घोषणा केली आहे. Xiaomi ने खुलासा केला आहे की, पांडा डिझाइनसह Xiaomi 14 Civi Limited Edition पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार आहे. Xiaomi 14 Civi Limited Edition with Panda Design हा फोन 29 जुलै रोजी भारतात लाँच केला जाईल. नवे उपकरण भारतात देखील लिमिटेड एडिशनमध्ये लाँच होणार आहे, असे कंपनीने सांगितले आहे.
Also Read: Realme Narzo N61 च्या भारतातील लॉन्च डेटची पुष्टी! तुमच्या बजेटमध्ये असेल का किंमत?
Xiaomi 14 Civi Limited Edition India लाँच डिटेल्स
Xiaomi 14 Civi Limited Edition हा विशेष प्रकार यापूर्वी भारतीय लॉन्चिंगसाठी टीज करण्यात आला होता. त्यानंतर चिनी टेक जायंटने अखेर जाहीर केले आहे की, नवे एडिशन भारतात कधी लाँच होणार आहे. नवीन पांडा डिझाइनसह Xiaomi 14 Civi स्मार्टफोन्स 29 जुलै रोजी लाँच होणार आहे.
Get ready to turn heads! 🐼✨
— Xiaomi India (@XiaomiIndia) July 24, 2024
Introducing the Limited Edition #PandaDesign of the #Xiaomi14CIVI – where sleek meets chic.
Dropping on 29th July.
Stay tuned: https://t.co/siorUcZv9H pic.twitter.com/MEWpaaU2HV
Xiaomi 14 Civi Limited Edition with Panda Design नवीन मिरर ग्लास आणि व्हेगन लेदर व्हर्जन, पिंक, मोनोक्रोम आणि ब्लू एडिशनमध्ये उपलब्ध असेल, असे देखील कंपनीने उघड केले आहे.
Xiaomi 14 Civi Panda Edition
लीकनुसार, Xiaomi 14 Civi Panda Edition हा फोन 12GB + 512GB स्टोरेजमध्ये टॉप एंड मॉडेल म्हणून सादर केला जाऊ शकतो. मात्र, त्याच्या डिझाइनशिवाय, इतर फीचर्स ओरिजनल फोनसारखेच असणार आहेत. त्यामुळे या आगामी लिमिटेड एडिशन फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1.5K रिझोल्यूशन आणि 6.55-इंच लांबीचा OLED डिस्प्ले मिळणार आहे.
एवढेच नाही तर, Xiaomi 14 Civi स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8s Gen 3 SoC प्रोसेसरसह सुसज्ज आहे. बॅटरीसाठी यात 4,700mAh बॅटरी असेल, जी 67W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच, या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 32MP चा शूटर मिळत आहे. फोनमधील फीचर्समध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, इन्फ्रारेड सेन्सर, हाय-रिझोल्यूशन ऑडिओ, डॉल्बी ATMOS सपोर्टसह स्टिरिओ स्पीकर इ.समाविष्ट असतील.
Xiaomi 14 Civi ची भारतीय किंमत
Xiaomi 14 Civi स्मार्टफोनचे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 39,999 रुपयांना लॉन्च करण्यात आले. तर, फोनचे 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेल 44,999 रुपयांना उपलब्ध आहे. त्याबरोबरच, फोनवर अनेक उत्तम बँक ऑफर्स आणि डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहेत. आता Xiaomi 14 Civi Panda Edition स्पेशल व्हेरिएंट कोणत्या किमतीत लाँच केले जातील, हे फोन लाँच झाल्यावरच कळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile