आजपासून भारतात Xiaomi 14 Civi ची पहिली सेल सुरु होणार
Xiaomi चा हा स्मार्टफोन Flipkart वर 12 वाजतापासून खरेदीसाठी उपलब्ध होणार
HDFC आणि ICICI बँक कार्डवर 3000-3000 रुपयांची सूट
प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने Xiaomi 14 Civi स्मार्टफोन भारतात अलीकडेच लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर आज Xiaomi 14 Civi ची पहिली सेल सुरु होणार आहे. पहिल्या सेलदरम्यान स्मार्टफोन खरेदीवर तुम्हाला प्रचंड सूट मिळेल. लाँचसोबतच स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. Xiaomi चा हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Flipkart वर 12 वाजता खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
Xiaomi 14 Civi दोन व्हेरिएंटमध्ये भारतीय बाजरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB+256GB आणि 12GB+512GB व्हेरिएंटचा समावेश आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये इतकी आहे. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 47,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये HDFC आणि ICICI बँक कार्डवर 3000-3000 रुपयांची सूट दिली जाईल.
Xiaomi 14 Civi चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये 6.55 इंच लांबीचा क्वाड कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या फोनमध्ये तुम्हाला स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर मिळेल. फोनच्या सुरक्षिततेसाठी या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे. या हँडसेटमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी Xiaomi 14 Civi मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP मेन कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 50MP टेलिफोटो लेन्स मिळेल. आकर्षक सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये ड्युअल 32MP + 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, उत्तम फोटोग्राफीसाठी लाइव्ह, नाईट आणि HDR सारखी कॅमेरा फीचर्स उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन फोनमध्ये 4,700mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.