बहुप्रतीक्षित Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Ultra स्मार्टफोन अखेर भारतीय बाजारात लाँच, बघा टॉप 5 Powerful फिचर्स। Tech News 

बहुप्रतीक्षित Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Ultra स्मार्टफोन अखेर भारतीय बाजारात लाँच, बघा टॉप 5 Powerful फिचर्स। Tech News 
HIGHLIGHTS

Xiaomi 14 सिरीज अखेर भारतात लाँच झाली आहे.

Xiaomi भारतात 10 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये कोका-कोला ब्रँडेड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

बहुप्रतीक्षित Xiaomi 14 सिरीज अखेर भारतात लाँच झाली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Ultra हे दोन फोन सादर केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Xiaomi भारतात तिचा 10 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने कंपनीने आपल्या प्रीमियम स्मार्टफोन्सचे अनावरण केले आहे. विशेष म्हणजे फोटोग्राफीसाठी फोनमध्ये कोका-कोला ब्रँडेड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे. चला तर मग जाणून घेऊयात Xiaomi 14 सिरीजच्या फोनची किंमत, उपलब्धता आणि सर्व तपशील.

हे सुद्धा वाचा: Best Smartphones For Your Eyes: तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अप्रतिम आहेत ‘हे’ लेटेस्ट 5G स्मार्टफोन्स, बघा यादी। Tech News

xiaomi 14 ultra

Xiaomi 14 Series ची भारतीय किंमत

Xiaomi 14 फोन एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 69,999 रुपये आहे. या फोनमध्ये जेड ग्रीन, मॅट ब्लॅक आणि क्लासिक व्हाईट असे तीन कलर पर्याय आहेत.

या फोनवर अनेक ऑफर्स मिळणार आहेत. बँक कार्डद्वारे या फोनवर 5000 रुपयांची सूट आणि 5000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. डिस्काउंटनंतर ते 59,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनची विक्री 11 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Amazon, Xiaomi India आणि Flipkart वर सुरू होत आहे.

Xiaomi 14 Ultra फोनमध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेल सादर केले गेले आहेत, ज्याची किंमत 99,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर बँक कार्डद्वारे 5000 रुपयांची सूट आणि 5000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळेल. या फोनमध्ये ब्लॅक आणि व्हाइट कलर ऑप्शन्स आहेत. फोनची विक्री 12 एप्रिलपासून Amazon आणि Xiaomi India वर सुरु होईल.

Xiaomi 14 Series चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Xiaomi 14 फोनमध्ये 6.36 इंच लांबीचा डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1.5K पिक्सेल आहे. तर, फोनच्या Ultra मॉडेलमध्ये 6.73 इंच लांबीचा OLED कर्व डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि रिझोल्यूशन 2K पिक्सेल आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये Xiaomi शील्ड ग्लास देण्यात आला आहे.

प्रोसेसर आणि स्टोरेज

Xiaomi 14 फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज उपलब्ध आहे. Xiaomi 14 Ultra फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज उपलब्ध आहे.

xiaomi 14 ultra camera

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Xiaomi 14 फोनमध्ये Leica ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्राइमरी, 50MP चा सेकंडरी, 50MP चा तिसरा कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये एक वेगळा मूव्ही मोड देण्यात आला आहे. यासह तुम्हाला या फोनसह उत्कृष्ट व्हिडिओ शूट करता येईल.

Xiaomi 14 Ultra मध्ये फोटोग्राफीसाठी Leica ब्रँडेड क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्राइमरी, 50MP सेकंडरी कॅमेरा, 50MP तिसरा कॅमेरा आणि 50MP चौथा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. त्याबरोबरच, सेल्फीसाठी या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. यात Xiaomi AISP सपोर्ट आहे, जो AI टूल्ससह येतो.

बॅटरी

Xiaomi 14 फोनची बॅटरी 4610mAh आहे, ज्यामध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. तसेच 50W वायरलेस चार्जिंग देखील उपलब्ध आहे. तर, Xiaomi 14 Ultra फोनची बॅटरी 5,300mAh आहे, ज्यामध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo