Xiaomi 13 Ultra च्या लाँचची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. फ्लॅगशिप स्मार्टफोन बर्याच काळापासून चर्चेत आहे आणि अधिकृत लॉन्चपूर्वी त्याचे तपशील अनेकदा लीक आणि टीझर्सद्वारे उघड झाले आहेत. मात्र, आता प्रतीक्षा संपली आहे. Xiaomi 13 Ultra काल म्हणजेच 18 एप्रिल रोजी ग्लोबली लाँच करण्यात आला आहे. Xiaomi 13 Ultra ला Leica चा कॅमेरा देण्यात आला आहे. बघुयात फोनला खास बनवणारी टॉप 5 फीचर्स :
डिव्हाइसची 12GB + 256GB व्हेरिएंटसाठी CNY 5,999 (अंदाजे रु. 71,600), 16GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी CNY 6,499 (अंदाजे रु. 77,600), आणि 16GB + 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किमंत CNY 7,299 म्हणजेच अंदाजे 87,200 रुपये इतकी आहे. हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि ऑलिव्ह ग्रीन रंगात खरेदी करता येईल.
Xiaomi 13 Ultra मध्ये 6.73-इंच लांबीचा AMOLED WQHD+ डिस्प्ले मिळत आहे, जो 1,440 x 3,200 पिक्सेल रिझोल्यूशनसह समर्थित आहे. डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2600 nits च्या पीक ब्राइटनेससह येतो.
फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC मिळत आहे, जो Adreno 740 GPU, 16GB LPDDR5X रॅम आणि 1TB UFS 4.0 स्टोरेजसह समर्थित आहे. डिव्हाइस Android 13 वर आधारित MIUI 14 कस्टम स्किनवर काम करतो.
फोनमध्ये 5,000mAh बॅटरी मिळत आहे, जी 90W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. वायर्ड फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीद्वारे 34 मिनिटांत फोन पूर्णपणे चार्ज होणार, असा दावा आहे.
विशेषतः डिव्हाइसमध्ये 50-मेगापिक्सेल 1-इंच लांबीचा सोनी IMX989 प्राथमिक सेन्सर आहे, तर उर्वरित तीन 50-मेगापिक्सेल IMX858 सेन्सर आहेत. कॅमेऱ्याला Leica डिझाइन केलेल्या Summicron लेन्ससह 6 वेगवेगळ्या फोकल लेंथ लेन्स देण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच, सेल्फीसाठी डिव्हाइसमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.