1% बॅटरीवर तब्बल एक तास चालेल? आगामी स्मार्टफोनबद्दल Xiaomi चा दावा

Updated on 16-Apr-2023
HIGHLIGHTS

आगामी फ्लॅगशिप फोन Xiaomi 13 ultra भारतात लाँच होण्यासाठी सज्ज

फोन केवळ 1% बॅटरीसह संपूर्ण एक तास चालेल?

1% बॅटरीमध्ये 12 मिनिटे कॉलिंग देखील मिळेल?

स्मार्टफोन ब्रँड Xiaomi आपला नवा आणि आगामी फ्लॅगशिप फोन Xiaomi 13 ultra भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने या फोनबाबत बरेच दावे केले आहेत. जसे की, फोनचा कॅमेरा Leica ब्रँडिंगसह येईल आणि फोन केवळ 1% बॅटरीसह संपूर्ण एक तास चालेल. चला तर या दव्यांबाबत सविस्तर माहिती बघुयात- 

1% बॅटरीमध्ये 12 मिनिटे कॉलिंग

वर सांगिल्याप्रमाणे 1% बॅटरीवर Xiaomi 13 ultra फोन एक तास म्हणजेच तब्बल 60 मिनिटे चालेल, असा दावा कंपनीने केला आहे. एवढेच नाही, तर 1% बॅटरीवर तुम्हाला या फोनवर 12 मिनिटे कॉलिंग देखील करता येणार आहे. कंपनीचे हे दावे हैराण करणारे आहेत. 

Xiaomi 13 ultra अपेक्षित तपशील

मिळालेल्या माहितीनुसार, फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह अँड्रॉइड 13 आधारित MIUI 14 मिळू शकतो. 

या व्यतिरिक्त, कॅमेरा Leica ब्रँडिंगसह सादर केला जाईल, याची पुष्टी कंपनीने केली आहे. यासह Summicron लेन्स Sony IMX989 आणि Sony IMX858 सेन्सर मिळतील. फोन क्वाड कॅमेरा सेटअपसह लाँच होण्याची शक्यता आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल. तसेच, अन्य सेन्सरसुध्दा 50MP चे मिळण्याच्या शक्यता आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :