Xiaomi 13 स्मार्टफोन सिरीज 11 डिसेंबर रोजी लाँच होणार, वाचा सविस्तर…

Xiaomi 13 स्मार्टफोन सिरीज 11 डिसेंबर रोजी लाँच होणार, वाचा सविस्तर…
HIGHLIGHTS

Xiaomi चे Weibo अकाऊंट जवळपास आठवडाभर निष्क्रिय राहिल्यानंतर अखेर सक्रिय

Xiaomi 13 सिरीजची लाँच डेट जाहीर

Xiaomi 13 सिरीज 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता अधिकृतपणे लाँच होणारसाठी सज्ज

Xiaomi 13 सिरीज डिसेंबर 2022 च्या सुरुवातीला चीनमध्ये पदार्पण करणार आहे. Xiaomi चे Weibo अकाऊंट जवळपास आठवडाभर निष्क्रिय राहिल्यानंतर अखेर सक्रिय झाले आहे. नवीन लॉन्च तारखेची पुष्टी करण्याव्यतिरिक्त, कंपनीने Xiaomi 13 चे डिझाइन प्रदर्शित करण्यासाठी काही पोस्टर देखील जारी केले आहेत. Xiaomi 13 सिरीज चीनमध्ये 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता (स्थानिक वेळेनुसार) अधिकृतपणे लाँच होण्यासाठी सज्ज आहे.

हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! iPhone 13 आज अगदी स्वस्तात उपलब्ध, लगेच बुक करा…

इव्हेंटमध्ये XIAOMI 13 सिरीजमधील स्मार्टफोन Xiaomi 13, Xiaomi 13 Pro, MIUI 14, Xiaomi Watch S2 स्मार्टवॉच, Xiaomi Buds 4 TWS इयरबड्स आणि मिनी होस्ट डेस्कटॉप PC यासारख्या अनेक प्रोडक्ट्स  दिसतील. Xiaomi 13 आणि 13 Pro ची डिझाईन समान असेल. 

Xiaomi 13 मध्ये पंच-होल डिझाइनसह फ्लॅट AMOLED डिस्प्ले असेल, जसे की कॅमेरावर Leica ब्रँडिंग असण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत प्रो मॉडेलमध्ये कर्व एजसह मोठा डिस्प्ले आहे. मागे, Xiaomi 13 मध्ये स्क्वेअर- साईजचा कॅमेरा मॉड्यूल आहे. यात तीन कॅमेरे, ड्युअल- LED फ्लॅश असेल. Xiaomi 13 हे गोलाकार किनार असलेले फ्लॅट-एज स्मार्टफोन आहेत. 

यात उजव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर की आहे. स्मार्टफोनच्या वरच्या काठाला दोन होल आहेत. हे मायक्रोफोन, IR ब्लास्टर आणि स्पीकरसाठी असू शकतात. स्मार्टफोनच्या बॉटमला सिम स्लॉट, मायक्रोफोन, USB – C पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहे. फोनच्या ब्लू व्हेरिएंटमध्ये लेदर बॅक आहे. हे स्मार्टफोन ग्लास बॅक पॅनलसह ग्रीन, ब्लॅक आणि व्हाईट व्हेरिएंटमध्ये येण्याची अपेक्षा आहे.

Xiaomi 13 चे अपेक्षित तपशील 

Xiaomi 13 स्मार्टफोनमध्ये 6.36-इंच लांबीचा E6 AMOLED FHD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. Snapdragon 8 Gen 2 समर्थित स्मार्टफोन 12GB पर्यंत LPDDR5x RAM आणि 512GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसह येतात. यात 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी, Xiaomi 13 मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल + 12-मेगापिक्सेल + 10-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा युनिट असण्याची अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo