जसजसे आपण वर्षाच्या शेवटी येत आहोत, स्मार्टफोन ब्रँड एकापेक्षा जास्त स्मार्टफोन लाँच करत आहेत. आता एका नवीन लीकमध्ये Xiaomi 13 सिरीजशी संबंधित नवीन माहिती समोर आली आहे.
हे लीक Weibo द्वारे समोर आली आहे. या ऑनलाइन पोस्टमध्ये ब्लॉगरने Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro च्या डिस्प्लेबद्दल माहिती शेअर केली आहे. चिनी टेक कंपनीचे CEO, लेई जून यांनी पुष्टी केली आहे की, कंपनी नवीन अल्ट्रा मॉडेल, Mi 11 अल्ट्रा लाँच करणार आहे. आत्ता आम्हाला बेस मॉडेल आणि प्रो मॉडेलबद्दल माहिती मिळाली आहे.
हे सुद्धा वाचा : आता थेट WhatsApp वर Aadhaar आणि PAN card डाउनलोड करा, बघा स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया
रिपोर्टनुसार, Xiaomi 13 मध्ये 6.38-इंच लांबीचा डिस्प्ले मिळेल. असे झाल्यास, बेस मॉडेलमध्ये आम्हाला Xiaomi 12 मॉडेलपेक्षा थोडा मोठा डिस्प्ले मिळेल. मात्र, मोठा डिस्प्ले फुल HD + रिझोल्यूशनसह येईल. 13 Pro चा डिस्प्ले 12 Pro सारखाच असेल, जो 6.73-इंच लांबीचा पॅनेल आहे, ज्याचे रिझोल्यूशन QHD + आहे.
मात्र, अद्याप या अहवालाबाबत काही स्पष्ट झाले नाही, त्यामुळे सध्या हा अहवाल पूर्णपणे अचूक मानला जाऊ शकत नाही. आम्हाला आत्तापर्यंत जी माहिती आहे त्यावर आधारित, Xiaomi 13 सिरीज Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC च्या घोषणेनंतर लवकरच लाँच होईल. स्मार्टफोन OEM सहसा चिपमेकरचे नवीनतम हाय-एंड चिपसेट स्वीकारणाऱ्यांपैकी एक असतात, त्यामुळे यावेळीही असेच घडताना पाहून आश्चर्य वाटणार नाही. याशिवाय, कंपनी आपल्या पुढील प्रीमियम ग्रेड स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांसाठी Leica सोबत भागीदारी करत आहे, अशी माहिती मिळाली आहे.