Xiaomi 13 Pro आज भारतात होणार लाँच, इव्हेंटचे लाइव्ह स्ट्रीम कधी आणि कुठे पाहता येईल…

Xiaomi 13 Pro आज भारतात होणार लाँच, इव्हेंटचे लाइव्ह स्ट्रीम कधी आणि कुठे पाहता येईल…
HIGHLIGHTS

Xiaomi 13 Pro भारतात लाँच होणार आहे.

Xiaomi 13 सीरीज अंतर्गत 3 उपकरणे जागतिक स्तरावर लाँच केली जातील.

हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल.

Xiaomi कंपनी आपली बहुप्रतिक्षित Xiaomi 13 सीरीज 26 फेब्रुवारी रोजी जागतिक बाजारात लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये Xiaomi 13, Xiaomi 13 Pro आणि Xiaomi 13 Lite मॉडेल्सचा समावेश असू शकतो. कंपनीने घोषणा केली आहे की, Xiaomi 13 Pro स्मार्टफोन भारतात आज 26 फेब्रुवारी 2023 ला लॉन्च केला जाईल. बाकीचे डिव्हाइसेस आगामी काळात लॉन्च केले जाऊ शकतात. 

हे सुद्धा वाचा : अगदी निम्म्या किमतीत मिळेल Netflix सबस्क्रिप्शन! पेमेंट करण्यापूर्वी फक्त एक अट…

कधी आणि कुठे बघता येईल लाँच इव्हेंट… 

कंपनी आज 26 फेब्रुवारीला Xiaomi 13 Pro स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Lite हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत सादर केले जातील. हा लॉन्च इव्हेंट संध्याकाळी 4 वाजता GMT भारतीय वेळेनुसार 8:30 वाजता सुरू होईल. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया चॅनेलवर या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीम पाहू शकता.

 

 

Xiaomi 13 सिरीजमध्ये तीन उपकरणांचा समावेश असेल. Xiaomi 13, Xiaomi 13 Pro आणि Xiaomi 13 Lite. आम्ही तुम्हाला सांगतो, Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro फोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत, तर Xiaomi 13 Lite मॉडेल Xiaomi Civi 2 रीब्रँडेड व्हर्जनच्या रूपात दाखल होईल.

अपेक्षित स्पेसिफिकेशन्स : 

Xiaomi 13 Pro चीनमध्ये लाँच झाला आहे. भारतात येणारा Xiaomi 13 Pro व्हेरिएंट चायनीज व्हेरियंटसारखाच असणार आहे. या फोनमध्ये 6.73 इंचाचा OLED 2K डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz आहे आणि रिझोल्यूशन 1,440×3,200 पिक्सेल आहे. डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षण उपलब्ध आहे. 

याशिवाय, फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. फोनची बॅटरी 4,820mAh आहे, ज्यामध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. तसेच 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. फोनमध्ये डॉल्बी ATMOS सपोर्ट आहे. 

फोटोग्राफीसाठी Xiaomi च्या फोनमध्ये Leica ब्रँडचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेटअपमध्ये HyperOIS सपोर्टसह 50MP 1-इंच सोनी IMX989 प्राथमिक कॅमेरा समाविष्ट आहे. यासोबतच 50MP 75mm टेलिफोटो सेन्सर आणि 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo