तारीख नोट करा ! Xiaomi 13 Pro फ्लॅगशिप फोनची लाँच डेट जाहीर…
Xiaomi 13 Pro ची लाँच डेट जाहीर
हा फोन 26 फेब्रुवारी रोजी लाँच होणार
कंपनीने अद्याप फोनची किंम उघड केली नाही.
स्मार्टफोन ब्रँड Xiaomi ने आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Pro भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे. हा फोन 26 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. फोनच्या फीचर्सची माहितीही समोर आली आहे. Xiaomi 13 Pro भारतात स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 प्रोसेसरसह सादर केला जाईल. कंपनीने हा फोन आधीच देशांतर्गत बाजारात सादर केला आहे.
हे सुद्धा वाचा : Vodafone-Idea चा आकर्षक प्लॅन, फक्त 107 रुपयांमध्ये मिळेल बरेच काही
Xiaomi 13 Pro चे स्पेसिफिकेशन
कंपनीने फोनच्या स्पेसिफिकेशनबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. फोन आधीच देशांतर्गत बाजारात सादर केला गेला आहे. भारतात देखील फोन त्याच Xiaomi 13 Pro या फीचर्ससह सुसज्ज असू शकतो. फोनच्या चायनीज वेरिएंटनुसार, फोन स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 प्रोसेसरने सुसज्ज असेल. तर, 6.73 इंच 2K OLED डिस्प्लेसह फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 12 GB LPDDR5X रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज मिळेल.
फोनमध्ये 4820mAh बॅटरीसह 120W वायर्ड फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनला Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.3, USB टाइप-C पोर्ट आणि NFC साठी समर्थन मिळेल. फोनसोबत वॉटर रेसिस्टंटसाठी IP68 रेटिंग मिळू शकते.
फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, भारतात तो Leica ब्रँडिंगसह 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा सेटअपसह सुसज्ज असेल. फोनसोबत सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल.
Xiaomi 13 Pro किंमत
कंपनीच्या फोनचे एक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये फोन 26 फेब्रुवारी रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9:30 वाजता लॉन्च होईल असे सांगण्यात आले आहे. Xiaomi ने अद्याप फोनच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. कंपनीने नुकताच हा फोन देशांतर्गत बाजारात CNY 4,999 म्हणजेच सुमारे 61,000 रुपयांना लॉन्च केला आहे. हा फोन भारतातही त्याच किंमतीत सादर केला जाऊ शकतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile