Xiaomi 13 pro : अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळतोय 80 हजारांचा फोन, वाचा डिटेल्स

Updated on 12-Apr-2023
HIGHLIGHTS

Xiaomi 13 pro वर मिळतेय प्रचंड सवलत

Amazonवर हा फोन 10 हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह मिळेल.

बघुयात बँक ऑफर्स आणि इतर भारी ऑफर्स

तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला उच्च दर्जाचे फीचर्स हवे आहेत. तर आम्ही तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलो आहोत. Xiaomi 13 pro हा एक जबरदस्त फोन आहे. हा फोन सध्या स्वस्तात खरेदी करता येणार आहे. म्हणजेच हा फोन तुम्हाला निम्म्यापेक्षा कमी किमतीत मिळेल. अधिक माहितीसाठी संपूर्ण बातमी वाचा- 

Xiaomi 13 pro ची किंमत

Amazon वर  Xiaomi 13 pro च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89,999 रुपये आहे. मात्र, हा फोन थेट 10 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह मिळेल. म्हणजेच हा फोन 79,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. तसेच, यावर बँक ऑफर्सदेखील मिळत आहेत. ICICI बँक कार्डने व्यवहार केल्यास 8 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.   

त्याबरोबरच, जर तुम्हाला EMI व्यवहार करायचा असेल तर दरमहा 3,822 रुपये द्यावे लागतील. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 33,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. संपूर्ण ऑफर्सचा लाभ मिळाल्यास फोन तुम्हाला केवळ 38,999 रुपयांना खरेदी करता येईल. येथून खरेदी करा 

Xiaomi 13 pro

 Xiaomi 13 pro मध्ये 6.73 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस स्क्रीन दिली गेली आहे. तसेच, फोन स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 ने सुसज्ज आहे. यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिली गेली आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास 4820mAh ची बॅटरी आहे, जी 120W हायपर चार्ज सपोर्टसह येईल. 

कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP Leica प्रोफेशनल सेन्सर आहे. दुसरा 50MP टेलीफोटो मॅक्रो सेन्सर आणि तिसरा 50MP अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. आकर्षक सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट सेन्सर मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :