Xiaomi डिसेंबरपर्यंत नवीन स्मार्टफोन सीरीज बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. नवीन सिरीजमध्ये Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro चा समावेश आहे. नवीन सिरीज व्हॅनिला मॉडेल म्हणजेच Xiaomi 13 ची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे आणि कर्व कॉर्नर आहेत, अशी माहिती मिळाली आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. फोनमध्ये, कंपनी 6.3-इंच लांबीचा फुल AMOLED HD+ डिस्प्ले देणार आहे, जो 1.5K आणि 120Hz रिफ्रेश रेटच्या रिझोल्यूशनसह येईल.
हे सुद्धा वाचा : Amazon: आवडत्या प्रोडक्ट्सवर येणार मोठी डील तर लगेच मिळेल अलर्ट, 'अशा'प्रकारे अलर्ट तयार करा
Xiaomi 13 बद्दल बातमी आहे की, हा फोन नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2022 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. Qualcomm 15 नोव्हेंबर रोजी Snapdragon 8 Gen 2 SoC ची घोषणा करू शकतो. घोषणेनंतर, Xiaomi हा स्मार्टफोन लाँच करू शकतो. कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.
बाजारात सुरु असलेल्या बातम्यांनुसार, Xiaomi 13 Pro मध्ये 6.73-इंच लांबीचा QHD AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यासह, त्याच्या वरच्या मध्यभागी एक होल पंच कट आउट कॅमेरा असू शकतो. दुसरीकडे, Xiaomi 13 Pro मध्ये 5000mAh ची पावरफुल बॅटरी असू शकते, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. दुसरीकडे, फोनच्या प्रोसेसरबद्दल बोलले जात आहे की, हा Snapdragon 8 Gen 2 SoC प्रोसेसर सह लाँच केला जाऊ शकतो.