Xiaomi ने Xiaomi 12S स्मार्टफोन सीरीज लॉन्च केली आहे. Xiaomi 12S, Xiaomi 12S Pro आणि Xiaomi 12S Ultra हे तीन डिवाइस सिरीजमध्ये आणण्यात आली आहेत. हा फोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनच्या कॅमेऱ्यासाठी कंपनीने Leica Optics सोबत खास भागीदारी केली होती. या लेखात आम्ही Xiaomi 12S, आणि Xiaomi 12S Pro ची किंमत आणि फीचर्सबद्दल माहिती देणार आहोत…
हे सुद्धा वाचा : Asus च्या जबरदस्त गेमिंग स्मार्टफोनची लॉन्चिंग, 18GB RAM आणि 6000mAh बॅटरीसह मिळतील अनेक फीचर्स
Xiaomi 12S स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत RMB 3,999 म्हणजेच अंदाजे 47,000 रुपये आहे. तसेच, 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत RMB 4,299 म्हणजेच अंदाजे 50,700 रुपये आहे. त्याचप्रमाणे, 12GB + 256 GB व्हेरिएंटची किंमत RMB 4,999 म्हणजेच अंदाजे 55,400 रुपये आहे. 12GB + 512GB मॉडेलची किंमत RMB 5,199 म्हणजेच अंदाजे 61,300 रुपये आहे. हे फोन ब्लॅक, व्हाइट, वाइल्ड ग्रीन आणि पर्पल कलर ऑप्शनमध्ये येतील.
त्याचप्रमाणे, 12S Pro स्मार्टफोनच्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत RMB 4,699 म्हणजेच अंदाजे 55,400 रुपये, 8GB + 256GB ची किंमत RMB 4,999 म्हणजेच अंदाजे 58,900 रुपये आहे. तसेच, 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत RMB 5,399 (अंदाजे 63,650 रुपये) आणि 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत RMB 5,899 (अंदाजे 69,500 रुपये) आहे.
फोनमध्ये 6.28-इंच लांबीचा FHD + AMOLED डिस्प्ले आहे, जो HDR10 + आणि Dolby Vision ला सपोर्ट करतो. यात Qualcomm Snapdragon 8+ Gen1 चिपसेट आणि Adreno GPU आहे. प्रोटेक्शनसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. यात 4,500mAh बॅटरी मिळते, जी 67W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी 50MP प्रायमरी सेन्सर, 13MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 5MP मॅक्रो कॅमेरा उपलब्ध आहेत. समोर 32MP सेल्फी स्नॅपर आहे.
फोनमध्ये 6.73-इंच लांबीचा 2K AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो. हे उपकरण Qualcomm Snapdragon 8+ Gen1 चिपसेटसह येते. त्याची 4,600mAh बॅटरी 120W फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP सोनी सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 50MP तिसरा कॅमेरा आहे. समोर 32MP सेल्फी स्नॅपर आहे.