फोटोग्राफी करण्याची मजा द्विगुणित होणार, Xiaomi चा 200 MP कॅमेरा फोन लवकरच भारतात येणार
Xiaomi 12i Hypercharge लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार
फोन Redmi Note 12 Pro+ चे रिब्रँडेड वर्जन असण्याची शक्यता
फोनच्या मागील पॅनल वर 200MP चा प्राइमरी कॅमेरा असण्याची माहिती
Xiaomi 11i हायपरचार्ज या वर्षी चीनी टेक कंपनी Xiaomi ने लाँच केले होते. अहवालात असे म्हटले आहे की, या फोनचा सक्सेसर Xiaomi 12i Hypercharge खरोखर Redmi Note 12 Pro+ ची रीर्ब्रँडेड वर्जन असू शकते. ही माहिती MIUI टेस्टर Kacper Skzypek ने दिली आहे. म्हणजेच कंपनी Redmi Note 12 Pro+ ला नवीन नावाने भारतीय बाजारात लाँच करेल.
हे सुद्धा वाचा : Cyber Security : अवघ्या सेकंदात ओळखा फेक वेबसाईट, जाणून घ्या अगदी सोप्या युक्त्या…
Redmi Note 12 सिरीज या वर्षी चीनमध्ये लाँच करण्यात आली होती. ज्यामध्ये Redmi Note 12, Redmi Note 12 Pro, Redmi Note 12 Pro+ आणि Redmi Note 12 Explorer Edition या चार स्मार्टफोन्सचा समावेश आहे. कंपनीने 5G सपोर्टसह सर्व नवीन उपकरणे आणली आहेत. आता या लाइनअपचे पॉवरफुल डिव्हाईस भारतीय बाजारात नवीन नावाने लाँच केले जाऊ शकतात.
संभावित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Xiaomi चा Redmi Note 12 Pro+ स्मार्टफोन 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरीसह येतो. सध्याच्या Xiaomi 11i हायपरचार्जच्या तुलनेत हे एक मोठे अपग्रेड असेल, ज्यामध्ये 120W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh बॅटरी आहे. कॅमेरा आणि इतर बाबींमध्येही, या डिव्हाइसला अपग्रेड्स मिळण्याची खात्री आहे आणि भारतातही हे मजबूत वैशिष्ट्यांसह लॉन्च केले जाईल.
नवीन डिव्हाइसमध्ये 120Hz OLED डिस्प्लेसह 6.67-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे. फोन MediaTek Dimensity 1080 प्रोसेसरने 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह समर्थित आहे. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले, तर फोनच्या मागील पॅनल वर 200MP चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा लेन्स देखील मॉड्यूलमध्ये देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, यात 16MP फ्रंट कॅमेरा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile