Xiaomi 12 pro च्या किमतीत दुसऱ्यांदा मोठी कपात, आता स्वस्तात खरेदी करा फ्लॅगशिप स्मार्टफोन
कंपनीने Xiaomi 12 Pro च्या किमतीत दुसऱ्यांदा कपात केली आहे.
ICICI, HDFC, SBI आणि Axis Bank क्रेडिट कार्डवर 2,000 रुपयांची झटपट सूट
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कंपनीने हा फोन पहिल्यांदा स्वस्त केला होता.
नुकतेच Xiaomiने आपलय लोकप्रिय दोन स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. हे फोन Redmi K50i आणि Redmi Note 12 5G आहेत. आता कंपनीने Xiaomi 12 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोनची किंमत कायमची कमी केली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनीने Xiaomi 12 Pro च्या किमतीत दुसऱ्यांदा कपात केली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कंपनीने हा फोन पहिल्यांदा स्वस्त केला होता.
Xiaomi 12 pro ची नवी किंमत
Xiaomi 12 Pro स्मार्टफोन 62,999 रुपये किमतीत गेल्या वर्षी लाँच करण्यात आला होता. त्यानंतर, फेब्रुवारी 2023 महिन्यात कंपनीने हा फोन 10,000 रुपयांनी स्वस्त केला होता. त्यानंतर त्याची किंमत 52,999 रुपये झाली होती. पण आता पुन्हा एकदा Xiaomi कंपनीने हा फ्लॅगशिप फोन स्वस्त केला आहे.
Get your hands on the #Xiaomi12Pro now!
Available at just ₹42,999: https://t.co/DX0XgyKRQu pic.twitter.com/DNz7cRZ8I8— Xiaomi India (@XiaomiIndia) June 1, 2023
यावेळी हा फोन 8 हजार रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. आता तुम्ही त्याचा 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 44,999 रुपयांना आणि 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 49,999 रुपयांना खरेदी करू शकता. त्याबरोबरच, कंपनी ग्राहकांना ICICI, HDFC, SBI आणि Axis Bank क्रेडिट कार्डवर 2,000 रुपयांची झटपट सूट देखील देत आहे.
Xiaomi 12 pro चे मुख्य तपशील
Xiaomi च्या स्मार्टफोनमध्ये 6.73 इंच लांबीचा कर्व डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबत, 12GB पर्यंत रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज देखील आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP मेन लेन्स, अल्ट्रा वाइड आणि टेलिफोटो लेन्स आणि 32MP कॅमेरा आहे. हा मोबाईल फोन 4,600mAh जंबो बॅटरीने सुसज्ज आहे. यात 120W वायर आणि 50W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile