digit zero1 awards

ग्राहकांची मजा ! Xiaomi 13 Pro येताच Xiaomi 12 Pro ची किंमत 10,000 रुपयांनी कमी

ग्राहकांची मजा ! Xiaomi 13 Pro येताच Xiaomi 12 Pro ची किंमत 10,000 रुपयांनी कमी
HIGHLIGHTS

Xiaomi 12 Pro च्या किमतीत कपात

एवढेच नाही तर बँक ऑफर्सही उपलब्ध

कोणत्याही बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर 6,000 रुपयांची झटपट सूट

Xiaomi 13 Pro भारतातील ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च होताच, गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Xiaomi 12 Pro ची किंमत 10,000 रुपयांनी कमालीची कमी करण्यात आली आहे. किमतीत कपात केल्यानंतर, तुम्ही हे उपकरण किती स्वस्तात खरेदी करू शकता, ते बघुयात… 

हे सुद्धा वाचा : 60 वर्षांत प्रथमच Nokia ब्रँड ओळख बदलणार, बघा कसा असेल नवीन लोगो…

Xiaomi 12 Pro ची भारतात किंमत :

 या डिव्हाइसचे 8 GB मॉडेल 62,999 रुपयांना लाँच केले गेले होते. परंतु आता 10 हजारांच्या कपातीनंतर तुम्ही हा प्रकार 52,999 रुपयांना खरेदी करू शकता. 12 GB व्हेरिएंट 66,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. परंतु तुम्ही आता हे मॉडेल 56,999 रुपयांना खरेदी करू शकता. 

10 हजारांची कपात तर झालीच पण फोनसोबत अनेक ऑफर्सही उपलब्ध आहेत. कोणत्याही बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर 6,000 रुपयांची झटपट सूट, Redmi-Xiaomi फोनच्या एक्सचेंजवर 6,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि इतर कंपनीच्या फोनवर 5,500 रुपयांचा बोनस दिला जाईल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स : 

फोनमध्ये 6.73-इंच लांबीचा WQHD + AMOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश दर 120 Hz पर्यंत आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 1 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. 4600 mAh बॅटरी 120 W हायपरचार्ज तंत्रज्ञानासह प्रदान करण्यात आली आहे, जी 50 W वायरलेस आणि 10 W रिव्हर्स चार्जला सपोर्ट करते.

फोनच्या मागील पॅनलमध्ये 50MP Sony IMX707 वाइड-एंगल प्राइमरी कॅमेरा आहे, 50MP टेलिफोटो लेन्ससह 32MP सेल्फी कॅमेरा सेन्सर आणि 50MP अल्ट्रा-वाइड एंगल कॅमेरा सेन्सर आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo