Xiaomi 12 Pro वर मिळतेय पूर्ण 38% सूट, ऑफर चुकवू नका

Xiaomi 12 Pro वर मिळतेय पूर्ण 38% सूट, ऑफर चुकवू नका
HIGHLIGHTS

Xiaomi 13 Pro लाँचनंतर Xiaomi 12 Proची किमंत कमी

Xiaomi 12 Pro 62 हजार 999 रुपयांना लाँच करण्यात आला होता.

फोनमध्ये 50MP वाइड अँगल कॅमेरासह 50MP टेलिफोटो सेन्सर आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर

या वर्षाच्या सुरुवातीलाच Xiaomi कंपनीने Xiaomi 13 Pro लाँच केला होता. नवा फोन आल्यानंतर Xiaomi 12 Pro स्मार्टफोनवर भारी डिस्काउंट मिळतोय. कंपनी मोठ्या सवलतीसह हा फोन विकतोय. या फोनवर उत्तम डील उपलब्ध आहे. Amazonवर हा फोन थेट सुट आणि एक्सचेंज ऑफर्ससह उपलब्ध आहे. बघुयात डील-  

Xiaomi 12 Pro वरील ऑफर्स 

Xiaomi हा फ्लॅगशिप स्मार्टफोन (8GB रॅम) 62 हजार 999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. या डिवाइसच्या 12GB मॉडेलची किंमत 66 हजार 999 रुपये होती. पण Xiaomi 13 Pro लाँच झाल्यानंतर आता Xiaomi 12 Pro 38% डिस्काउंटनंतर 49,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

याशिवाय, या फोनवर बँक ऑफर्सदेखील मिळतील. या फोनच्या 12GB रॅम वेरिएंट 13,000 रुपयांच्या मोठ्या डिस्काउंटनंतर 53,999 रुपयांना खरेदी करता येईल. याव्यतिरिक्त, Xiaomi 12 Pro खरेदी करताना, तुम्हाला जुना फोन एक्सचेंज करायचा असेल तर, 25 हजार 500 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. 

Xiaomi 12 Pro 

फोनमध्ये 6.73-इंच लांबीचा WQHD+ डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये Octa Core Snapdragon 8 Generation 1 प्रोसेसर उपलब्ध असेल. मागील बाजूस 50MP वाइड अँगल कॅमेरासह 50MP टेलिफोटो सेन्सर आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. तसेच, 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 120W हायपरचार्ज तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारी 4600 mAh बॅटरी आहे, जी 10W रिव्हर्स आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo