Xiaomi ची बंपर ऑफर! 5G फोनवर 11,000 रुपयांपर्यंत सूट, तीन महिने YouTube प्रीमियम देखील मोफत

Xiaomi ची बंपर ऑफर! 5G फोनवर 11,000 रुपयांपर्यंत सूट, तीन महिने YouTube प्रीमियम देखील मोफत
HIGHLIGHTS

Xiaomi 12 Pro 5G तब्बल 11 हजार रुपयांपर्यंतच्या सूट

सर्व सूट मिळाल्यास फोन 51,999 रुपयांमध्ये तुमचा असू शकतो

युजर्सना तीन महिन्यांसाठी YouTube Premium चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळेल.

तुम्हाला उत्तम कॅमेरा आणि उत्तम डिस्प्ले असलेला 5G फोन घ्यायचा असेल, तर Xiaomi ने तुमच्यासाठी एक अप्रतिम ऑफर आणली आहे. कंपनीच्या वेबसाइटवरून तुम्ही Xiaomi 12 Pro 5G तब्बल 11 हजार रुपयांपर्यंतच्या सूटसह खरेदी करू शकता. जर तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी ICICI बँकेचे कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 6,000 रुपयांपर्यंत झटपट सूट मिळेल. याशिवाय, कंपनी फोनवर चेकआउटच्या वेळी 5000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील देत आहे. या दोन्ही ऑफरसह, फोनवर एकूण सवलत 11,000 रुपये होईल.

हे सुद्धा वाचा : WhatsAppमध्ये आले नवीन जबरदस्त फीचर, आता ऑनलाइन न दिसता चॅट करत रहा

 Xiaomi 12 Pro 5G 12GB पर्यंत RAM आणि 256GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज आहे. कोणत्याही ऑफरशिवाय त्याची सुरुवातीची किंमत 62,999 रुपये आहे. सर्व ऑफर्ससह, हा फोन 51,999 रुपयांमध्ये तुमचा असू शकतो. एवढेच नाही तर हा फोन खरेदी करणाऱ्या युजर्सना तीन महिन्यांसाठी YouTube Premium चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळेल.

Xiaomi 12 Pro 5G चे फिचर आणि स्पेसिफिकेशन्स 

हा फोन 1440×3200 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.73-इंच QHD + E5 LTPO 2.0 AMOLED डिस्प्लेसह सुसज्ज आहे. डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश रेट आणि 480Hz च्या टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. HDR10+ आणि डॉल्बी व्हिजनसह या फोनमध्ये डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी गोरिल्ला ग्लास विक्टस देखील देण्यात आला आहे.

त्याबरोबरच, अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये 4600mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, Dual SIM, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

Xiaomi चा हा प्रीमियम फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून, यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये LED फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 50-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी, फोनच्या पुढील बाजूस 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo