Xiaomi 11T Pro 5G वर तब्बल 21,500 रुपयांची सूट, दिवाली सेलमध्ये मिळतायेत अप्रतिम ऑफर्स

Xiaomi 11T Pro 5G वर तब्बल 21,500 रुपयांची सूट, दिवाली सेलमध्ये मिळतायेत अप्रतिम ऑफर्स
HIGHLIGHTS

Xiaomi चा दिवाळी सेल सुरु आहे

सेलमध्ये ग्राहकांना Xiaomi ची उपकरणे प्रचंड सवलतीसह मिळतील

Xiaomi 11T Pro 5G वर तब्बल 21,500 रुपयांची सूट मिळतेय

Xiaomi चा दिवाळी सेल आज 20 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. सेल दरम्यान, अनेक Xiaomi आणि Redmi स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. कंपनीने ग्राहकांसाठी सवलतीच्या दरात अनेक ऑफर जाहीर केल्या आहेत. Mi Diwali Sale मध्ये Xiaomi 11T Pro 5G अतिशय स्वस्तात विकला जात आहे. प्रीमियम स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला 49,999 रुपयांपासून लाँच करण्यात आला होता. Xiaomi आता त्याच्या प्रीमियम स्मार्टफोनच्या खरेदीवर 21,500 रुपयांपर्यंत सूट देत आहे. Xiaomi 11T Pro 5G वर उपलब्ध असलेल्या सर्व ऑफर्स जाणून घेऊयात… 

हे सुद्धा वाचा : Blaupunkt चा स्वस्त 75-इंचाचा स्मार्ट टीव्ही लाँच, जबरदस्त TV सह घराला बनवा सिनेमा हॉल

Xiaomi 11T Pro 5G वरील सवलत

Xiaomi 11T Pro हा कंपनीने या वर्षी भारतात लाँच केलेला पहिला प्रीमियम स्मार्टफोन होता आणि त्यात Snapdragon 888 SoC आहे. बेस 8GB रॅम ऑप्शनसाठी हा डिवाइस 49,999 मध्ये लाँच करण्यात आला होता. बेस व्हेरियंटमध्ये 128GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आले होते.

Xiaomi आता 11T Pro 5G च्या खरेदीवर 15,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. दिवाळी दरम्यान, Mi सेलमध्ये फोन  34,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. जर बँक आणि इतर ऑफर किंमतीत समाविष्ट केल्या तर ही सूट आणखी वाढू शकते. बँक ऑफरनंतर, ही सूट 21,500 रुपये असेल.

xiaomi 11t pro 5g

Xiaomi दिवाळी सेलमध्ये, ग्राहक बँक ऑफ बडोदा आणि ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून Xiaomi 11T Pro 5G वर ₹6,500 अतिरिक्त सवलत देखील मिळवू शकतात.

Xiaomi 11T Pro 5G रु. 28,499 मध्ये खरेदी करा

 28,499 रुपयांमध्ये, Xiaomi 11T Pro हा स्नॅपड्रॅगन 888 SoC सुविधा देणारा सर्वात परवडणारा फोन आहे. या किंमत श्रेणीतील इतर फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 870 SoC आहे, जो स्नॅपड्रॅगन 888 पेक्षा थोडा कमी दर्जाचा आहे. 11T Pro 5G मध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनमध्ये 108MP ट्रिपल-कॅमेरा सेटअप आणि 120Hz AMOLED डिस्प्ले देखील आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo