जर तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Amazon वर एक उत्तम ऑफर आहे. Xiaomi 11T Pro फोनची MRP 52,999 रुपये आहे, परंतु ऑफरमध्ये, 30% डिस्काउंटनंतर त्याची किंमत 36,999 रुपये झाली आहे. बँक ऑफरमध्ये, सर्व कार्डवर 4,000 रुपयांची झटपट सूट देखील दिली जात आहे. याशिवाय तुम्ही HDFC क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 2,500 रुपयांची एक्स्ट्रा इन्स्टंट सूटही मिळेल.
हे सुद्धा वाचा : Poco चा नवीन स्वस्त 5G फोन, 64MP ट्रिपल कॅमेरा आणि दमदार बॅटरीसह क्वालकॉम प्रोसेसर
वरील सर्व ऑफरसह, फोनवर उपलब्ध एकूण सूट 22,500 रुपयांपर्यंत जाते. तसेच, एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 18,300 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. येथून खरेदी करा…
फोनमध्ये कंपनी 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंच लांबीचा AMOLED डॉटडिस्प्ले देत आहे. डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करणाऱ्या या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. त्याचा टच सॅम्पलिंग रेट 480Hz आहे. कंपनी या डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन देखील देत आहे, जे 1000 निट्सच्या पीक ब्राइटनेस लेव्हलला समर्थन देते.
Xiaomi चा हा फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. यात स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट त्याच्या X60 5G मॉडेमसह देण्यात आला आहे. लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी आणि साइड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 120W Xiaomi हायपरचार्ज टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीचा दावा आहे की, यासह फोन 17 मिनिटांत 100% पर्यंत चार्ज होतो.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह तीन कॅमेरे मिळतील. यामध्ये 108-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आणि 5-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. त्याबरोबरच, सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले कॅमेरा देण्यात आला आहे.