फ्लिपकार्टवर खरेदी करा LG G5 ५२,९९० रुपये
LG G5 ला ह्याआधी MWC 2016 मध्ये लाँच केले गेले होते. हा पहिला असा स्मार्टफोन आहे, जो मॉड्यूलर डिझाईनमध्ये लाँच केला गेला होता आणि आज ह्या स्मार्टफोनला भारतातसुद्धा लाँच केले गेले आहे. ह्याला आपण फ्लिपकार्टच्या माध्यमातून ५२,९९० रुपयांत खरेदी करु शकता. ह्या स्मार्टफोनसह तुम्हाला एक बॅटरी आणि एक चार्जिंग क्रॅडल मोफत मिळत आहे.
LG हा पहिला असा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, ज्यात मेटल बॉडी आणि फिंगरप्रिंट स्कॅनर दिले गेले आहे. ह्यात आपल्याला 5.3 इंचाची IPS LCD डिस्प्ले 2560x1440p रिझोल्युशनसह मिळत आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर देण्यात आले आहे. हा भारतात मिळणारा दुसरा असा स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह लाँच केला गेला आहे. ह्याआधी शाओमी MI 5 स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर देण्यात आले होते. त्याशिवाय LG च्या ह्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 200GB पर्यंत वाढवू शकतो.
हेदेखील वाचा – Wiperoid: हा अॅप ठरणार मोबाईल चोरीच्या गंभीर प्रश्नावर रामबाण उपाय
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप सुद्धा मिळत आहे. ह्यात आपल्याला १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/1.8 अॅपर्चरसह आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा f/2.4 अॅपर्चरसह देण्यात आला आहे. ह्याचा वाइड अँगल लेन्स 135 डिग्रीसह वाइड फोटो काढतो. त्याशिवाय ह्यात 2800mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे. ह्यात आपल्याला क्विक चार्जसह 3.0 सह मिळत आहे. LG ने असा दावा केला आहे की, हा स्मार्टफोन १९ तासांचा टॉकटाईम आणि जवळपास २४० तासांचा स्क्रीन टाइम देण्यास सक्षम आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात आपल्याला कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ब्लूटुथ, NFC, 4G आणि LTE सपोर्ट मिळत आहे.
LG ने ह्या स्मार्टफोनसह काही एक्सेसरीजसुद्धा मिळत आहे. ह्यात LG 360 कॅम, 360 VR आणि LG Rolling Bot यांचा समावेश आहे.
हेदेखील वाचा – यू यूनिकॉर्न विरुद्ध शाओमी रेडमी नोट 3: कोणता स्मार्टफोन आहे सरस
हेदेखील वाचा – जुलै महिन्यापासून ऑफलाइन बाजारात मिळणार यू यूनिकॉर्न