HTC Desire 22 Pro हा जगातील पहिला Metaverse फोन म्हणून लाँच करण्यात आला आहे. याला Metaverse Phone म्हटले जात आहे, कारण या फोनमध्ये तुम्हाला HTC च्या Vive Flow VR Headset चे सपोर्ट आणि इतर अनेक टेक्नॉलॉजी मिळतील, तुम्हाला फोनमध्ये NFT सपोर्ट देखील मिळत आहे. या फोनमध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर मिळतोय.
युरोपमध्ये, हा फोन 399 युरो म्हणजेच सुमारे 38,536 रुपये या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला फोनमध्ये ब्लॅक आणि गोल्ड कलर ऑप्शन्स मिळतील.
HTC DESIRE 22 PRO चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
हा HTC फोन HTC च्या Viverse ecosystem आणि HTC Vive Flow हेडसेट सपोर्टसह येतो. फोनद्वारे तुम्हाला व्हर्च्युअल रियालिटीचा आनंद घेता येईल, हे फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. याशिवाय, या फोनमध्ये तुम्हाला मोफत NFT सपोर्ट देखील मिळत आहे.
या HTC फोनमध्ये 4520mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय तुम्हाला फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर मिळत आहे, एवढेच नाही तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजही मिळत आहे. त्यासोबतच, Android 12 चा सपोर्ट मिळतोय.
यामध्ये तुम्हाला 6.6-इंच लांबीचा पंच-होल डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये तुम्हाला 32MP सेल्फी कॅमेरा, 64MP प्रायमरी कॅमेरा, 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 5MP डेप्थ सेन्सर मिळत आहे. फोनला IP67 रेट करण्यात आले आहे, म्हणजेच हा फोन डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट फोन आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.