Namotel अच्छे दिन हा ९९ रुपयात मिळणारा नवीन स्मार्टफोन आहे आणि ह्याचे प्रमोटर माधव रेड्डी यांनी सांगितले आहे की, हा जगातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.
रेड्डींचे म्हणणे आहे की, हा स्मार्टफोन केवळ ९९ रुपयात विकला जाईल आणि ह्यात आपल्याला 4 इंचाच्या डिस्प्लेसह अॅनड्रॉई़ 5.1 लॉलीपॉप आणि 1.3GHz चे क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB चे रॅम मिळत आहे.
आपण ह्या स्मार्टफोनची बुकिंग १७ मे ते 25 मे पर्यंत करु शकता. ह्या स्मार्टफोनची कंपनी Namotel.com नुसार ह्या स्मार्टफोनची किंमत २,९९९ रुपयांवरुन ९९ रुपये केली आहे. हा लेख लिहिताना आम्ही ही वेबसाइट उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती उघडली नाही. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनला कॅश ऑन डिलिवरीच्या माध्यमातूनही खरेदी करु शकता. त्याशिवाय आपल्याला ह्या स्मार्टफोनसाठी वेगळे डिलिवरी चार्जेस द्यावे लागतील.
Namotel अच्छे दिन चे १० आकर्षक वैशिष्ट्ये:
क्वाड-कोर प्रोसेसर
1GB रॅम+ 4GB अंतर्गत स्टोरेज
3G स्मार्टफोन
2MP रियर कॅमेरा + 3MP फ्रंट कॅमेरा
ड्यूल सिम सपोर्ट
4 इंच HD डिस्प्ले
1325mAh बॅटरी
प्लॅस्टिक बॉडी
पांढरा आणि काळ्या रंगात उपलब्ध
अॅनड्रॉईड लॉलीपॉप
हेेदेखील वाचा – 10 हजाराच्या बजेटमध्ये येणारे उत्कृष्ट आणि आकर्षक स्मार्टफोन्स(मार्च २०१६)
हेदेखील वाचा – झोलो ब्लॅक 1X च्या किंमतीत झाली घट, ही आहे ह्याची नवीन किंमत