“फ्रीडम 251” स्मार्टफोनची डिलिवरी लांबणीवर, ६ जुलैपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा

“फ्रीडम 251” स्मार्टफोनची डिलिवरी लांबणीवर, ६ जुलैपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा
HIGHLIGHTS

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251 लकी ड्रॉ द्वारा मिळणार असल्यामुळे ह्याची डिलिवरी थोडी लांबणीवर टाकल्याचे कंपनीचे डायरेक्टर मोहित गोयल यांनी सांगितले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय बनलेल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी रिंगिग बेल्सचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251 हँडसेट लवकरच उपलब्ध होणार आहे. कंपनीने ह्याची तारीख ६ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. कंपनी ह्याआधी हा फोन ३० जूनला डिलिवर करणार होती. मात्र आता ही तारीख ६ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे.त्याशिवाय कंपनीने घोषणा केली आहे की, आता हा फोन लकी ड्रॉद्वारा दिला जाईल.

कंपनीचे डायरेक्टर मोहित गोयलने असे सांगितले आहे की, ते २ लाख हँडसेटची डिलिवरी करण्यासाठी तयार आहेत. मात्र हा फोन लकी ड्रॉ द्वारा मिळणार असल्यामुळे ह्याची डिलिवरी थोडी लांबणीवर टाकल्याचे कंपनीचे डायरेक्टर मोहित गोयल यांनी सांगितले आहे.

स्मार्टफोनमध्ये ते सर्व मिळत आहे, जे आपल्याला ५०००  पासून ७००० पर्यंत येणा-या स्मार्टफोनमध्ये मिळते. ह्या स्मार्टफोनमध्ये 4 इंचाची QHD IPS डिस्प्लेसह 1.3GHz चे क्वाड-कोर प्रोसेसर मिळणार आहे. त्याचबरोबर ह्यात फोटोग्राफीसाठी 3.2 MP चा रियर आणि 0.3MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. हा स्मार्टफोन 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1GB चे रॅम, 8GB चे अंतर्गत स्टोरेज ज्याला 32GB पर्यंत वाढवू शकतो.

हेदेखील पाहा – फ्लिपकार्टवर अशा ऑफर्स पुन्हा मिळणे नाही, आज आहे शेवटची संधी

त्याशिवाय ह्यात 1450mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर केवळ २५१ रुपयात आपल्याला 3G सपोर्ट करणारा एक ड्यूल सिम स्मार्टफोन मिळत आहे. कोणाचाही विश्वास बसणार नाही, अशीच ही गोष्ट आहे. पण हे खरे आहे. स्मार्टफोनसह आपल्याला 1 वर्षाची वॉरंटीसुद्धा मिळत आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल, ह्याचे सर्विस सेंटर शोधण्यास तुम्हाला खूप त्रास होईल, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ह्याची जवळपास ६५० पेक्षा जास्त सर्विस सेंटर्स  आपल्याला देशभरात पाहायला मिळतील.

हेदेखील वाचा – शाओमी Mi मॅक्स स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरु
हेदेखील वाचा – नुकतेच लाँच झालेले हे स्मार्टफोन्स एकमेकांना देतात कडक टक्कर

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo