10 डिसेंबरला लॉन्च होईल जगातील पहिला इनफिनिटी-O डिस्प्ले असलेला स्मार्टफोन
सॅमसंग 10 डिसेंबरला आपला गॅलेक्सी A8s स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे जो जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो इनफिनिटी-O डिस्प्ले सह येईल.
सॅमसंगने गेल्या महिन्यात झालेल्या आपल्या डेवलपर कांफ्रेंस मध्ये आपल्या पंच-होल कॅमेराची माहिती दिली होती. कंपनी याच महिन्यात आपला Galaxy A8s स्मार्टफोन लॉन्च करू शकते जो जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो इनफिनिटी-O डिस्प्ले सह येईल. सॅमसंगने आधी डिवाइसच्या लॉन्चची तारीख सांगितली नव्हती पण आता हुवावे कडून त्यासारखाच डिवाइस टीज करण्यात आल्यांनतर सॅमसंगने पण Galaxy A8s च्या लॉन्चची तारीख सांगितली आहे. हुवावे 17 डिसेंबरला आपला नोवा 4 स्मार्टफोन लॉन्च करण्यास तयार आहे तर सॅमसंग आपला गॅलेक्सी A8s डिवाइस 10 डिसेंबरला लॉन्च करेल.
चीन मध्ये सॅमसंगच्या अधिकृत अकाउंट वरून द्वारा लॉन्च तारखेची माहिती मिळाली आहे. याआधी सॅमसंग ने आपला फोल्डेबल स्मार्टफोन टीज केला होता पण सॅमसंगच्या आधीच चीनी कंपनी Royole ने आपला कमर्शियल फोल्डेबल स्मार्टफोन सादर करून सॅमसंगला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले.
गॅलेक्सी A8s पहिल्याच इनफिनिटी-O डिस्प्ले सह येईल आणि नुकतीच डिवाइसला US च्या FCC द्वारा सर्टिफिकेशन पण मिळाले आहे, ज्यावरून समजते की हँडसेट लवकरच US मध्ये लॉन्च केला जाईल.
लिस्टिंगनुसार, Galaxy A8s मध्ये 6.3 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असेल ज्याचे रेजोल्यूशन 1080×2340 पिक्सल असेल. तसेच डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 SoC, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह येईल.
प्रेस रेंडर नुसार, गॅलेक्सी A8s च्या बॅकला तीन कॅमेरा दिले जातील. या तिन्ही लेंस गॅलेक्सी A7 (2018) प्रमाणे बॅक पॅनलच्या डाव्या बाजूला वर्टिकली असतील. कॅमेरा मोड्यूल मध्ये एक छोटा LED फ्लॅश आणि एलिप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. असे बोलले जात आहे की Galaxy A8s मध्ये Galaxy A7 (2018) सारखाच कॅमेरा सेटअप असेल ज्यात 8MP 120-डिग्री अल्ट्रा वाइड लेंस, 5MP डेप्थ-सेंसिंग कॅमेरा आणि 24MP चा तिसरा कॅमेरा असेल. तसेच डिवाइसच्या फ्रंटला 24 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल.