आला Samsung Galaxy A8s, यात आहे इनफिनिटी-O डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगॉन 710 SoC

Updated on 18-Dec-2018
HIGHLIGHTS

सॅमसंग Galaxy A8s स्मार्टफोन चीन मध्ये आला आहे, अजून डिवाइसच्या किंमत समजलेली नाही.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, लीक्स आणि रुमर्सनंतर अखेरीस सॅमसंगचा Galaxy A8s चीन मध्ये लॉन्च झाला आहे. हा जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो इनफिनिटी-O डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. इनफिनिटी-O डिस्प्ले म्हणजे ज्यात फ्रंट फेसिंग कॅमेरा अड्जस्ट करण्यासाठी यात पंच-होल देण्यात आला आहे. Galaxy A8s च्या डिस्प्लेच्या टॉप लेफ्ट कॉर्नर वर पंच-होल मध्ये फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. याची स्क्रीन डायगोनली मोजल्यास 6.4 इंच आहे आणि टॉप ते बॉटम याचे मेजरमेंट 6.2 इंच आहे. सॅमसंगचा हा डिवाइस आणि हुवावेच्या सब ब्रांड ऑनर ने आपला नवीन Honor View20 स्मार्टफोन एकाच वेळी लॉन्च केला आहे जो एकसारख्याच इन-डिस्प्ले कॅमेरा टेक्नोलॉजी सह येतो.

Samsung Galaxy A8s ची किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

Samsung Galaxy A8s आधीच प्री-ऑर्डर साठी उपलब्ध आहे, पण कंपनी ने अजूनतरी स्मार्टफोनची किंमत सांगितली नाही. हा फोन ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 प्रोसेसर द्वारा संचालित आहे ज्यात एड्रेनो 616 GPU आहे. हा चीन मध्ये दोन वेरीएंट्स मध्ये उपलब्ध झाला आहे, याच्या एका वेरीएंट मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसऱ्या वेरीएंट मध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. Samsung Galaxy A8s मध्ये 6.4 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 आहे.

फोटोग्राफी साठी डिवाइसच्या बॅक वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सॅमसंग नेGalaxy A9सारखेच कॅमेरा या नवीन डिवाइस मध्ये वापरले आहेत. डिवाइसच्या बॅक वर 24 मेगापिक्सलचा प्राइमरी अल्ट्रा-वाइड सेंसर (f/1.7 अपर्चर सह), 10 मेगापिक्सलचा टेलीफोटो सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअप खाली एक LED फ्लॅश देण्यात आला आहे आणि फ्लॅशच्या उजवीकडे एक फिंगरप्रिंट सेंसर आहे. डिवाइसच्या फ्रंटला 24 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A8s एंड्राइड 8.1 ओरियो वर आधारित सॅमसंग एक्सपीरियंस UI 9.5 वर चालतो. डिवाइस ब्लू, ब्लॅक आणि ग्लास फिनिश सह सिल्वर कलर मध्ये विकत घेता येईल. फोन मध्ये 3300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :