VOOC 3.0 आणि हाइपरबूस्ट मुळे OPPO F11 Pro बनतो एक दमदार गेमिंग स्मार्टफोन

Updated on 26-Feb-2019
HIGHLIGHTS

OPPO F11 Pro VOOC 3.0 चार्जिंग टेक्नोलॉजी सह येतो जी 4000mAh ची बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यास जवळपास 20 मिनिटांचा वेळ वाचवते.

स्मार्टफोन्स मुळे आपले जीवन खूपच बदलले आहे. हे पॉकेट साइज गॅजेट्स अनेक कामे करू शकतात आणि दरवर्षी हे अजून चांगले होत आहेत. स्मार्टफोन इनोवेशन मुले अश्या ठिकाणी पोचले आहेत कि मॉडर्न स्मार्टफोन्स हाई रेजोल्यूशन डिस्प्ले, मोठा कॅमेरा सेटअप आणि चांगली परफॉरमेंस एका छोट्या बॉडी मध्ये ऑफर करतात. स्मार्टफोनची बॅटरी लाइफ मर्यादित असते आणि ती सतत चार्ज ठेवावी लागते. हि चार्जिंग प्रक्रिया पूर्ण होण्यास खूप वेळ लागतो आणि जर तुम्ही घाईत असाल आणि बॅटरी लो असेल तर हा चार्ज करणे थोडे कठीण होते. अशा परिस्थितीत फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी उपयोगी पडते जशी OPPO F11 Pro ची VOOC 3.0 टेक्नॉलॉजी.

https://twitter.com/oppomobileindia/status/1098862457727082496?ref_src=twsrc%5Etfw

VOOC चा अर्थ वोल्टेज ओपन लूप मल्टी-स्टेप कांस्टेंट-करंट चार्जिंग असा आहे आणि हि पहिल्यांदा भारतात OPPO ने 2018 मध्ये सादर केली होती. चार्जिंग सोल्यूशन फक्त फास्ट-चार्जिंग स्पीड्स देत नाही तर सोबतच ओवरहीटिंगच्या रिस्क विना सुरक्षितरित्या डिवाइस चार्ज पण करतो. VOOC 3.0 F11 Pro सह सादर केली जाईल आणि हि 4,000mAh कॅपेसिटी वाली बॅटरी सह येईल आणि फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

 

OPPO च्या नवीन VOOC 3.0 चार्जिंग टेक्नॉलॉजी मुळे चार्जिंग स्पीड स्लो वोल्टेज रिडक्शन सह चार्जिंग स्पीड वाढवता येईल ज्यामुळे 20 मिनिटांपर्यंतचा चार्जिंग टाइम वाचवला जाऊ शकतो.

 

फास्ट चार्जिंग एक असा फीचर आहे, जो प्रत्येकाला आपल्या स्मार्टफोन मध्ये हवा आहे. VOOC 3.0 टेक्नॉलॉजी मुळे तुम्हाला तासन तास आपला फोन फुल चार्ज करण्यासाठी वाट बघावी लागणार नाही. उलट थोडा वेळ डिवाइस चार्ज केल्यावर पण अनेक तास हा वापरता येईल. याचा उपयोग तेव्हा होईल जेव्हा तुम्ही घाईत असाल.

 

हा फीचर मोबाईल गेमर्सच्या खूप उपयोगी पडेल जे आपल्या स्मार्टफोन्स मध्ये खूप गेम्स खेळतात. मॉडर्न गेम्स जसे कि PUBG मोबाईल खूप पॉवर वापरतो, जो बॅटरी वेगाने संपवू शकतो. कधी कधी असे पण होते कि ज्या वेगाने फोन डिस्चार्ज होतो त्यावेगाने फोन चार्ज होत नाही. अशा वेळी VOOC 3.0 गेमर्स साठी खूप उपयोगी पडेल, जेणेकरून गेमर्स थोडा वेळ फोन चार्ज करून दीर्घकाळ गेम एन्जॉय करू शकतील.

 

एवढेच नव्हे तर, OPPO F11 Pro मध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे गेमर्सना आवडतील. या फीचर्स मधील सर्वात खास हाइपरबूस्ट आहे. हे फीचर गेमिंग सेशन साठी फोन ऑप्टमाइज करेल. हे फीचर मेमोरी अनुकूलित करतो ज्यामुळे गेम रॅमचा पूर्णपणे आणि जास्तीत जास्त लाभ घेऊ शकतो. हा लोडिंग स्पीड इम्प्रूव करू शकतो, ज्यामुळे तुम्हाला गेम लोड करण्यासाठी वाट बघावी लागणार नाही. हाइपरबूस्ट टच सेंसिटिविटी पण वाढवतो, जेणेकरून तुम्ही फक्त फोनने टच रजिस्टर केला नाही म्हणून एखादा गेम हरू नये. इम्प्रूव्ड गेमिंग एक्सपीरियंस साठी हाइपरबूस्ट इतर अनेक फीचर्स पण ऑफर करेल ज्यात गेम असिस्टेंट, गेम स्पेस आणि गेम स्पीच एनहांसमेंट यांचा समावेश आहे.

 

OPPO F11 Pro मेडीटेक च्या हीलियो P70 चिपसेट द्वारा संचालित आहे. हा एक ओक्टा-कोर CPU आहे जो ARM Mali-G72 GPU सह येत आहे आणि हा मागील P60 च्या तुलनेत चांगला आहे. नवीन हीलियो P70 गेमिंग च्या बाबतीत चांगली परफॉरमेंस ऑफर करतो आणि डिमांड गेम्स मध्ये चांगले फ्रेम रेट्स सादर करतो.

 

P70 चिपसेट आणि हाइपरबूस्ट चे कॉम्बिनेशन मुळे OPPO F11 Pro गेमर्स साठी एक चांगला ऑप्शन ठरतो. VOOC 3.0 आणि इतर फीचर्स या फोनला खूप दमदार बनवतात.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :