ब-याच दिवसांपासून चर्चेत असलेले विवोचे दोन नवीन स्मार्टफोन्स मंगळवारी लाँच झाले. विवोने काल आपले X6 आणि X6 प्लस लाँच केले . हे लाँच चीनमध्ये अधिकृतरित्या करण्यात आले आहे. ह्याच्या नावांवरुन असे दिसून येत आहे की, X6 हा एक स्मार्टफोन आहे आणि X6 प्लस एक फॅबलेट आहे. चला तर मग जाणून घेऊयात ह्या दोन स्मार्टफोन्समध्ये काय मिळत आहे. कंपनीकडून ४जीबी रॅम आणि मेटॅलिक बॉडीशिवाय काय काय ऑफर केले गेले आहे.
विवो X6 स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची FHD सुपर AMOLED डिस्प्ले आपल्याला 424ppi सह मिळत आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ६४ बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे, जो 1.7GHz स्पीड देतो. स्मार्टफोनमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यात 4GB रॅम आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा फेज डिटेक्शन ऑटोफोकस LED फ्लॅशसह दिला आहे. त्याशिवाय सेल्फीसाठी ह्यात ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. स्टोरेजविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ३२जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने १२८जीबीपर्यंत वाढवू शकतो. स्मार्टफोनमध्ये आपल्याला 2400mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे आणि हा स्मार्टफोन फनटच ओएस अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे.
ह्या स्मार्टफोनची किंमत CNY 2600 जवळपास २५,९५४ रुपये आहे आणि हा डिसेंबर ७ पासून मिळण्यास सुरुवात होईल.
तर विवो X6 प्लस एक फॅबलेट आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंचाची FHD सुपर AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे, जी 386ppi सह येते. फोनमध्ये 64GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकता. हा स्मार्टफोन दोन प्रकारात लाँच केला गेला आहे. पहिला 3000mAh क्षमतेच्या बॅटरीसह आणि दूसरा 4000mAh क्षमतेच्या बॅटरीसह लाँच केला आहे. ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. त्याचबरोबर चार्जिंग सपोर्टसुद्धा मिळत आहे.
ह्या स्मार्टफोनची किंमत 3200 CNY म्हणजे जवळपास ३३,२७५ रुपये आहे. आणि हा स्मार्टफोनसुद्धा ७ डिसेंबरपासून मिळण्यास सुरुवात होईल.