व्हाट्सॅप बिजनेस अॅप मध्ये लवकरच येईल चॅट फिल्टर फीचर

व्हाट्सॅप बिजनेस अॅप मध्ये लवकरच येईल चॅट फिल्टर फीचर
HIGHLIGHTS

व्हाट्सॅप बिजनेस अॅप मध्ये चॅट फिल्टर मध्ये यूजर तीन पर्यायांमध्ये मेसेजेस लवकर सर्च करू शकतात, या तीन पर्यायांमध्ये अनरीड चॅट, ग्रुप्स आणि ब्रॉडकास्ट लिस्ट चा समावेश आहे.

व्हाट्सॅप बिजनेस अॅपला लवकरच एक नवीन फीचर मिळणार आहे, हा चॅट फीचर सध्या एंड्राइड प्लॅटफार्म साठी तयार करण्यात येत आहे. इंस्टेंट मेसेजिंग कंपनी ने बिजनेस अॅप चा नवीन वर्जन रिलीज केला आहे याचा वर्जन नंबर 2.18.84 आहे. नवीन वर्जन मध्ये आगामी फीचर ची थोडी झलक बघायला मिळते, जे आता कंपनी ने डिसेबल केले आहेत आणि सध्या ही माहिती मिळाली नाही की कंपनी कधी हा फीचर जारी करेल. व्हाट्सॅप बिजनेस अॅप मध्ये चॅट फिल्टर मध्ये यूजर तीन पर्यायांमध्ये मेसेजेस लवकर सर्च करू शकतात, या तीन पर्यायांमध्ये अनरीड चॅट, ग्रुप्स आणि ब्रॉडकास्ट लिस्ट चा समावेश आहे. 
चॅट फिल्टर फीचर
जेव्हा तुम्ही सर्च स्क्रीन वर कोणताही मेसेज सर्च करायाला जाल तेव्हा तुम्हाला वर सांगितलेले तीन पर्याय मिळतील, या पर्याया मधील एक निवडून तुम्ही सर्च केलेला मेसेज त्या कॅटेगरी मधेच दिसले आणि याने मेसेज सर्च करणे अजून सोप्पे होईल. सध्यातरी व्हाट्सॅप बिजनेस अॅप किंवा स्टॅण्डर्ड व्हाट्सॅप मध्ये असा कोणताही फीचर उपलब्ध नाही पण कंपनी हा नवीन चॅट फीचर लवकरच लॉन्च करू शकते. 
ही बातमी WABetaInfo कडून मिळाली आहे आणि पब्लिकेशन ने अजून तरी स्टॅण्डर्ड व्हाट्सॅप अॅप्लीकेशन साठी चॅट फिल्टर फीचर ची कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे सध्यातरी हा फक्त व्हाट्सॅप बिजनेस अॅप साठी उपलब्ध होईल. सोबतच या फीचर वर काम चालू आहे आणि आगामी अपडेट्स मध्ये हा चांगल्या डिजाइन आणि इम्प्रूव्ड फंक्शन सह सादर केला जाऊ शकतो. 
iOS वर उपलब्ध होईल व्हाट्सॅप बिजनेस अॅप 
कंपनी ने iOS वर्जन साठी पण व्हाट्सॅप बिजनेस अॅप वर काम सुरू केले आहे पण अजूनतरी या अपडेट साठी कोणताही रिलीज टाइम देण्यात आला नाही. सध्या व्हाट्सॅप बिजनेस अॅप चे तीन मिलियन एक्टिव यूजर्स आहेत आणि iOS वर हा अॅप लॉन्च केल्यानंतर एक्टिव यूजर्स ची संख्या अजून वाढेल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo